आमच्याविषयी तुमचे काय मत आहे................
गुरुजींचे आणि आमचे संबन्ध जवळपास १३-१५ वर्षांपासून. गुरुजींची पूजा करण्याची पद्धत खूप सुंदर आणि शास्त्रोक्त.
अजूनपर्यंत आम्ही कोणतीच पूजाविधी गुरुजींशिवाय दुसऱ्या व्यक्तीस करावयास दिली नाही. अत्यंत सुंदर पूजेसोबतच गुरुजी माणूस म्हणून खूप प्रभावी करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने माझे लग्न लावले त्यानंतर खूप लोकांनी आम्हाला गुरुजींबद्दल विचारले. त्यांचे मंत्रोचार सगळ्यांना खूप आवडले. गुरुजींचे मार्गदर्शन मला आणि माझा परिवाराला नेहमीच प्रगतीचा दिशेने घेऊन जाणारे असते. ते योग्य मार्गदर्शन करण्यास नेहमी तयार असतात.
गुरुजींची प्रथम भेट जेव्हा घडली ते आमचे चांगले योगच! गुरुजींचे आशीर्वाद नेहमी आमच्यावर आहेत आणि राहतील. जय गणेश! -अनिरुद्ध विकास कुमावत (M. Sc. Maths, B. Tech.)