दत्ताचा नामजप
भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ, कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे.
देवतेचा नामजप करणे, ही कलियुगातील सर्वांत सोपी साधना आहे. देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप आणि असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे देवतेचे मारक रूप. यावरून लक्षात येते की, देवतेच्या तारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे ‘तारक’ नामजप आणि देवतेच्या मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे ‘मारक’ नामजप होय.
देवतेचा तारक नामजप केल्याने चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती येते, तसेच देवतेप्रती सात्त्विक भावही निर्माण होतो. वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी देवतेच्या तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
नामजपातून देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होण्यासाठी त्या त्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते. यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कसा करावा, हे समजून घेऊया. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा तारक नामजप करतांना श्री दत्तगुरूंचे रूप मनोमन डोळ्यांसमोर आणावे आणि तेच आपले पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी धावून येणार आहेत, असा भाव ठेवून नामजपातील प्रत्येक अक्षराचा भावपूर्ण उच्चार करावा.
याउलट मारक नामजप करतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांतील प्रत्येक अक्षर मारक स्वरात उच्चारावे. या वेळी देवतेच्या नामावर म्हणजे ‘दत्त’ या शब्दातील ‘द’ या अक्षरावर अधिक जोर द्यावा
स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा तारक किंवा मारक नामजप केल्यास व्यक्तीला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो. वर दिलेले तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि ‘ज्या नामजपामध्ये मन अधिक रमते’, तो नामजप करावा. एखादी व्यक्ती नियमित नामजप किंवा साधना करत नसेल, त्यानेही तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि जो नामजप आवडेल तो करावा. कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून देवतांचे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार
समाजातील नामजप करणार्या ९० टक्के व्यक्तींचा कल भावपूर्ण नामजप करण्याकडेच असतो. असे असले, तरी अन्य १० टक्के व्यक्ती, ज्यांना मारक भावातील नामजप उपयुक्त आहे, ते या नामजपापासून वंचित राहू नयेत, यासाठीही ते ध्वनीमुद्रित केले आहेत. या नामजपांविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
साधकांनी यापूर्वी दैनिक ‘ सद्गुरू ज्योतिष ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या चौकटीनुसार ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप करावा.