Home 2021 May Devicha Gondal Galne

देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

१. उद्देश
‘कुटुंबातील इतर जिवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवीतत्त्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते. पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या  वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.
२. परिणाम
>या वेळी आघातात्मक तेजरूपी नादाची निर्मिती होऊन या नादाकडे शक्तीतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. याचा परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून त्याद्वारे वास्तूतील अनेक वाईट शक्तींचे अल्प कालावधीत उच्चाटन होते. तसेच शक्तीतत्त्वात्मक लहरींचा दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते. नवरात्रीमध्ये ब्रह्मांडात तेजरूपी शक्तीतत्त्व कार्यमान असते. त्यामुळे या काळात देवीचा गोंधळ घातल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो.
३. ‘गोंधळी’ (देवीचे उपासक)
या जिवांमध्ये पिढ्यानपिढ्या देवीतत्त्वाची उपासना वसा म्हणून चालत आलेली असल्याने ते ‘देवीचे उपासक’ म्हणून गणले जातात. यांना ‘शक्तीरूपी गण’ किंवा ‘दास’ अशीही संज्ञा दिली जाते. ते त्यांच्या तेजोमय शक्तीरूपी वाणीतून देवीला आवाहन करून तिचे मारक तत्त्व जागृत करू शकतात. देवीचा गोंधळ घालणार्‍या जिवांचा ईश्वराप्रती असणारा भाव ३० प्रतिशत असेल, तर त्यांना आध्यात्मिक स्तरावर ३० प्रतिशत एवढ्या प्रमाणात चैतन्य प्राप्ती होते. भाव जास्त आणि अहंचे प्रमाणही अल्प असेल, तर ५० प्रतिशत एवढ्या प्रमाणात फलप्राप्ती होते. भावरहित कृतीमुळे लाभाचे प्रमाण १० प्रतिशत एवढेच असते
४. देवीचा गोंधळ घालण्यापेक्षा स्वतः साधना करणे महत्त्वाचे
कुलाचार पाळण्यासाठी गोंधळ घालणे, या कृतीला कर्तव्यपालन म्हणून १० प्रतिशत महत्त्व आहे, तर भावपूर्ण कृतीच्या स्तरावर कर्तव्यपालनाच्याही पुढे जाऊन धर्मपालनयुक्त कृती, म्हणजेच कुलदेवीचा नामजप करून स्वतः साधना करणे, याला ३० प्रतिशत महत्त्व आहे.’