Home 2021 May Dhanishta Nakshtrachi Bhavishvani

धनिष्ठा नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही जे काही करता त्यात बहुकुशल आणि हुशार आहात. कोणत्याही परिस्थितीशी तुम्ही स्वत:ला व्यवस्थित जुळवून घेता. तुम्ही कोणालाही मनाने, कृतीने आणि शब्दाने दुखवत नाही. तुमची ग्रहणशक्ती चांगली असते आणि तुम्ही सतत शिकण्यासाठी तयार असता. तुमचे मोहक हास्य तुम्हाला आकर्षक करते. तुमचा स्वभाव धार्मिक आहे आणि तुम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नाने, स्वभावाने,
क्षमतांनी चांगले वागण्याचा प्रयत्न करता.चांगले बोलण्याने तुम्हाला लोकांचा आधार आणि प्रेम सहज मिळते. लोकांचा मान आणि आदर कसा राखायचा हे तुम्हाला बरोबर कळते. तुमच्या बरोबर असणा-यांना सर्वांना आनंद आणि समाधान लाभते. तुम्ही खेळकर, मिसळणारे आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे आहात त्यामुळे तुम्हाला एकटे राहायला आवडत नाही.लोकांबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला चांगले वाटते. तुम्ही धार्मिक आणि उत्साही आहात, त्यामुळे तुम्हाला जबाबदा-या टाळणे आवडत नाही. अडचणी आणि समस्यांचा सामना करणे तुमचा स्वभाव आहे. तुम्हाला नृत्य आणि संगीत आवडते आणि तुम्ही चांगले गायक किंवा नर्तक होऊ शकता. वादविवादात तुम्ही उजवे ठरता ज्यामुळे तुम्ही राजकारण आणि कायद्यामध्ये उत्तम ठरता. तुम्ही गुप्तता राखू शकता त्यामुळे तुम्ही गुप्तहेर खात्यासाठी किंवा उच्चपदस्थांसाठी स्वीयसचिव म्हणून उत्तम असता. शिक्षण काही
तुम्हाला लोकांना तुमच्या प्रभावाखाली ठेवायला आवडते. त्यामुळे तुम्ही जे काही करता ते सावधपणे करता. तुमचा स्वाभिमान मोठा असतो ज्यामुळे आदरसन्मान तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. तुमची मानसिक ताकद मजबूत असते आणि तुम्ही भराभर निर्णय घेऊ शकता. तुम्हाला त्यात काहीही गैर वाटत नाही. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे तुम्ही चांगले यश मिळवू शकता. तुम्ही व्यवसायापेक्षा नोकरीला जास्त महत्व देता. पण व्यवसाय असो वा नोकरी तुम्ही उच्च पदावर असता.
शिक्षण आणि उत्पन्न
तुमच्यासाठी योग्य व्यवसाय क्षेत्रं इतिहासकार, संगीतकार, नर्तक, स्टेज कलाकार, धावपटू किंवा खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा भौतिकशास्त्र तज्ञ, कॉंप्युटर संबंधित कामे, सैनिक, कवी, गीतकार, गायक आणि संगीतकार, ज्योतिषी, अध्यात्मिक गुरू, सर्जन, विक्रेता किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणे, प्रशासकीय अधिकारी इ. तुमच्यासाठी इंजिनीयरींग आणि हार्डवेअरदेखील खूप चांगले ठरते. व्यवसायाच्या दृष्टीने मालमत्तेची कामे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
कौटुंबिक आयुष्य
भावंडावर तुमचे खास प्रेम असेल आणि वैवाहिक आयुष्य आनंदाचे असेल. जीवनसाथी नशीबवान ठरू शकेल. वारस म्हणून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल पण सासरकडून खूप मदत मिळणार नाही. तुमचा जोडीदार दयावन आणि दानशूर असेल. पण त्याला/तिला उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय असेल. तरीही लग्न तुम्हाला आर्थिक सौख्य मिळवून देईल