गुढीपाडवा
गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा, सृजणाचा आहे. या दिवसांमध्ये निर्सगात चैतन्य फुललेले असते. प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढया उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो.
आपणा मराठी माणसांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी एक महत्वाची बाजू आहे. गुढी पाडव्याला पंचांगपूजन केले जाते. ब्रम्हदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे.
शालिवहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. हा एक दाक्षिणात्य सण असून तो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात. ज्योतिषास बोलावून पुढच्या वर्षाचे भविष्य जाणून घेतात आणि महत्त्वाकांक्षी अशा शुभकार्याचा संकल्प सोडतात. गुढी पाडवा पूजा विधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानं�
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे.
तयार केलेली गुढी दारांत/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात.
दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. बहुतेक घरांमध्ये पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा बेत असतो. हरभरा डाळ भिजवून त्याची कैरी घालून केलेली चटणीला त्या दिवशी फार महत्व असते. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.
या दिवशी, कडुलिंबाची फुले, चिंच, कैरी, गूळ, हिंग आणि मिठ एकत्र करून एक मिश्रण बनवतात. घरातील सर्वांना ते पिण्यास देतात. एक प्रकारे नवीन वर्षात येणार्या कडू – गोड सर्व अनुभवांना सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी करण्यासाठी म्हणून हे पेय बनवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठीही चांगली असतात. चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो.
पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणाऱ्या बऱ्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.
पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेतीची मशागत अगोदर करून ठेवता येते. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेल, तर अशावेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावा; म्हणून लागणारे पाट, ताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठाकरता येतो अन् येणा-या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत इत्यादी आणून ठेवता येते.
कृपया गुढीपाडवा साजरा करतांना शासनाने लावलेल्या सर्व निर्बंधाचे पालन करावे ! सध्याच्या आपत्काळात गुढीपाडवा असा साजरा करा ! – सध्या अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. अशा वेळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभी करण्यासाठी साहित्य मिळाले नाही; म्हणून नवर्षाचा आध्यात्मिक लाभ घेण्यापासून वंचित राहू नका ! गुढीपाडवा पुढील पद्धतीने साजरा करा -* 💐 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 💐 सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥