Home 2021 May Hasta Nakshtachi Bhavishvani

हस्त नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही शिस्तप्रिय आहात आणि कोणत्याही समस्येचे फार अवडंबर न माजवता सामोरे जाता. तुम्ही चौकस असल्यामुळे तुमच्या डोक्यात अनेक कल्पना येत असतात. तुम्ही कुणाकडून फसवले जरी गेलात तरी तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध काही वाईटसाईट बोलत नाही. स्वभावाने तुम्ही शांत आणि तुमच्या स्वभावामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतात. तुम्ही संतुष्ट, मिळून-मिसळून वागणारे, मैत्रीपूर्ण आहात. तुम्ही अभ्यासात एकदम तल्लख असून तुम्ही शब्दांचे जादूगार आहात. तुम्हाला कोणताही विषय पटकन समजतो. थोडेसे गोड बोलून तुम्ही कोणत्याही गटात मिसळून जाता आणि तुमच्यात विनोदाचेही अंग आहे. इतकी सगळी मानसिक क्षमता असताना कोणताही निर्णय तुम्ही पटकन घेत नाही. तुम्ही शांतताप्रिय असल्यामुळे तुम्ही भांडणांपासून तसे दूरच राहता. तुम्ही मनस्थिती बरेचदा द्विधा असते, असे असले तरी तुम्ही नवीन मित्र जोडता. त्याचप्रमाणे तुम�
कारण पैशाची बचत कशी करायची ते तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे. तुम्ही शांतताप्रिय व्यक्ती आहात आणि दुसऱ्याला मदत करायला सदैव तत्पर असता आणि तुम्हाला दिखाऊपणा अजिबात आवडत नाही. तुमच्या कुटुंबात अनेक चढ-उतार असतील पण तुम्ही सदा हसतमुख असाल. मुद्दे तडीस नेण्यात तुमची हातोटी आहे. त्यामुळे तुम्ही एक चांगले समुपदेशक आहात. तुम्ही लोकांना खेळीमळीत आणि गमतीजमतीत आयुष्यातील धडे शिकवता कारण तुमच्या मते आयुष्य हा एक खेळ आहे आणि जग म्हणजे त्या खेळाचे मैदान. तुम्हाला स्वस्थ बसून राहणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्रीय असता. तुमचा स्वभाव खेळकर असला तरी तुम्ही दुसऱ्याने केलेल्या चुका सहन करू शकत नाही. तुमच्या प्रयत्नांनी आपले इच्छित फल प्राप्त करून घेणे हा तुमचा विशेष गुण आहे.
शिक्षण आणि उत्पन्न तुम्हाला शिस्तशीर पद्धतीने काम करणे आवडते. तुम्ही सर्वांना मागे टाकून जाता आणि हे सिद्ध कसे करायचे ते तुम्हाला माहीत आहे. सोनारकाम, हस्तकला, व्यापारी, अॅक्रोबॅट, जिम्नॅस्ट किंवा सर्कसमधील कलाकार, पेपरच्या उत्पदनाशी संबंधित काम, शेअर बाजार, पॅकेजिंग, खेळणी उत्पादन, दुकान, लिपिक, बँकेतील काम, टंकलेखक, फिजिओथेरपिस्ट, सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित काम, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, कपड्यांशी संबंधित काम, शेती, बागकाम, रेडिओ आणि दूरचित्रवाणी; वृत्तनिवेदक, पत्रकारिता, चिकणमाती आणि सिरॅमिकशी संबंधित क्षेत्रे इत्यादी तुम्हाला अनुकूल असतील.
कौटुंबिक आयुष्य तुमचे आदर्श वैवाहिक आयुष्य असेल, पण काही लहानसहान कुरबुरी असणे शक्य आहे. तुमच्या जोडीदाराची वागणूक चांगली आहे. तुमचे पहिले अपत्य हा बहुधा मुलगा असेल.