जपमाळ माहिती
जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
!!! ॐ नमः शिवाय !! जपमाळ माहिती जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
जप करण्याची पद्धत ————————— शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप : उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते. तर्जनीने जप : शत्रुनाश होतो. मध्यमेने जप : धनप्राप्ती होते. अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते. करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.
जपाची शास्त्रीय पद्धत : मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने। (मंत्रमहार्णव) अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी. जपमाळेतील १०८ मणी : विद्युत शास्त्रात १०८ या अंकाचा खुलासा मिळतो. १०८ हा एक स्थिरांक उल्ल२३ंल्ल३ आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते, त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरडे म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार : ब्रह्मांडाला १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या १२ भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या १२ राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू संचरण करतात. या ९ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार १२ राशींशी केला तर १०८ संख्या प्राप्त होते. माळेमधील मोत्यांची १०८ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते. आणखी एका मान्यतेनुसार : ऋषीमुनींनी माळेमध्ये १०८ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे. शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि २७ नक्षत्रांचे एकूण १०८ चरण असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.