ज्येष्ठा नक्षत्राची भविष्यवाणी
तुमचे व्यक्तिमत्त्व निरोगी, उत्साहपूर्ण आणि अाकर्षक आहे. दयाळू, गंभीर-प्रामाणिक स्वभाव हे तुमच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीला पटेल तेच काम करता. तुम्ही दुसऱ्याचे म्हणणे ऐकत नसल्यामुळे त्यांना वाटते की तुम्ही हटवादी आहात. तुम्ही सिद्धांतवादी असल्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करता. तुमचे मन खुले आहे. त्यामुळे तुम्ही परंपरांच्या जोखडात अडकत नाही. तुमचा मेंदू तल्लख आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही विषय चटकन आत्मसाद करता. तुम्ही खूप घाई करता, त्यामुळे तुमच्याकडून अनेक चुका होतात. तुम्हाला काहीतरी मोठी गोष्ट मिळविण्याचे किंवा कोणीतरी मोठी व्यक्ती होण्याची प्रचंड इच्छा आहे. त्यामुळे इतरांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत असता.
तुमचे मन शुद्ध आणि सभ्य आहे, पण तुमच्या भावना इतरांना कळू नयेत याची काळजी घेतल्यामुळे तुमचे हे गुण कुणाला कळतच नाहीत. तुम्ही व्यावसायिक आयुष्यात खूप लवकर प्रवेश घ्याल आणि यासाठी फार दूरचा प्रवास करायलाही तुमची हरकत नसेल. तुम्ही सर्व काही अत्यंत एकाग्रतेने कराल.
त्यामुळे तुम्हाला यशसुद्धा मिळेल. तुम्ही पटकन हालचाल करू शकत असल्याने सगळे काही अगदी सहज कराल. तुम्हाला वेळेची किंमत ठावूक आहे. म्हणूनच तुम्ही निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही. नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला उच्च पद मिळेल आणि योग्य दिशा शोधण्यासाठी अनेक जण तुम्हाला मदत करतील. व्यवसायातसुद्धा तुम्हाला पूर्ण यश मिळेल. कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायची वेळ येईल, तेव्हा तुम्ही तुमच्या विरोधकांच्या वरचढ ठराल. वयाच्या १८ ते २६ वर्षे या कालावधीत तुमचे आयुष्य काहीसे खडतर असेल, पण तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. कोणतेही व्यसन तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. तम्ही विचारी,
कुशल आणि बुद्धिमान आहात. तुमच्या आजुबाजूला असलेल्या प्रत्येकाला निर्मळ प्रेमाची अनुभूती मिळेल आणि तुमची प्रतिमा जपण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असाल. तुम्हाला चांगले शिक्षण मिळेल आणि तुम्ही या शिक्षणाचा उपजीविकेसाठी सदुपयोग कराल.
शिक्षण आणि उत्पन्न
सुरक्षा खाते, सरकारी नोकरी, वृत्त प्रतिनिधी, रेडियो किंवा दूरचित्रवाणी कलाकार, वृत्तनिवेदक, अभिनेता, कथाकथन, अग्निशमन अधिकारी, गुप्तहेर, प्रशासकीय अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी, जहाज किंवा इतर जलवाहन सेवा, वन अधिकारी, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन, धावपटू, टेलिकम्युनिकेशन किंवा अवकाश यंत्रणेशी संबंधित काम, सर्जन इत्यादी क्षेत्रे तुमच्यासाठी अनुकूल आहेत.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे वैवाहिक आयुष्य तसे सामान्य असेल. पण तुम्ही कामानिमित्त तुमच्या कुटुंबापासून दूर राहाल. तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर खूप प्रभाव असेल, अशी शक्यता आहे. असे असले तरी, त्याचा/तिचा तुमच्यावरील प्रभाव तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्याला/तिला प्रकृतीच्या काही तक्रारी असू शकतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. भावंडांशी भांडण होण्याची शक्यता आहे.