माघ नक्षत्राची भविष्यवाणी
तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे आणि जिथे तुम्ही जाता तिथे आपले वर्चस्व राखून असता. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची जबाबादारी घेता तेव्हा ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करता कारण तुमच्यात प्रचंड उर्जा असून कष्ट करण्याची तयारी आहे. तुमचा काम करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यामुळे लोकांना तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचा अचंबा वाटतो. तुमचा स्वाभिमान काकणभर अधिकच आहे, त्याला तुम्ही कधीच धक्का बसू देत नाही. तुमच्या आत्मसन्मानाला धक्का बसणार नाही, यासाठी सर्वकाही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि अत्यंत सखोल विचार केल्यावर तुम्ही ते काम केलेले असेल. तुमचा देवावर गाढ विश्वास आहे. तुमचे सरकारशी आणि संबंधित खात्यांशी जवळचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे समाजातील उच्चभ्रू व्यक्तींशी तुमचा संपर्क आहे. या संबंधांमुळे तुमचा चांगला लाभ होऊ शकेल. तुमची वाणी गोड आहे आ�
तुमच्यामुळे कुणी दु:खी झाले आहे, असे तुम्हाला समजले तर तुम्ही ताबडतोब त्याची माफी मागता. स्वत:चा कोणताही फायदा करून न घेता लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करता आणि त्याबदल्यात कसलीही अपेक्षा करत नाही. नोकरी किंवा धंद्यात अतिप्रामाणिकपण केल्यामुळे तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात ऐशोआरामाच्या गोष्टी मिळवू शकाल. असे असले तरी सत्तेमुळे येणाऱ्या गर्वापासून तुम्ही चार हात लांब राहणेच श्रेयस्कर राहील. तुम्हाला भौतिक सुखे गोळा करायला आवडतात, त्याचबरोबर आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींकडेही तुमचा ओढा आहे. आदर्शवाद आणि सत्यवचन हे तुमचे गुण आहेत. तुम्ही संस्कृती, परंपरा आणि थोरामोठ्यांचा आदर करता. उपलब्ध सुविधांचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेता आणि तुमच्याकडे भरपूर कामगार असतील. जे तुमच्यासाठी काम करती�
तुम्ही अत्यंत चौकस राहण्याचा प्रयत्न करता. आर्थिक व्यवस्थापनाबाबत तुम्ही पूर्ण उर्जेने काम करता, त्यामुळेच तुम्ही यशस्वी होता. तुम्ही अनेक विषयांमध्ये तज्ज्ञ आहात. त्याचप्रमाणे तुम्हाला समाजसेवेचीसुद्धा आवड आहे. त्यामुळे तुम्ही अशा कामांमध्ये उत्साहाने सहभागी होता. दुसऱ्याच्या कामात अडथळा आणणारी माणसे तुम्हाला रुचत नाहीत. त्यामुळे तुमचे अनेक छुपे शत्रूसुद्धा आहेत. मैत्रीचा विचार करता तुमचे फार मित्र नाहीत. पण जे काही थोडे मित्र आहेत, ते तुमच्यासाठी सर्वस्व आहेत. तुमचे व्यक्तिमत्त्व सुंद आणि आकर्षक असेल आणि निस्वार्थीपणे लोकांसाठी काम करणे तुमच्या स्वभावातच आहे. स्पष्टवक्तेपणा ही तुमची ओळख आणि जमेची बाजू आहे.
शिक्षण आणि उत्पन्न तुमच्याकडे संपत्ती आणि नोकरचाकर असतील. ऐतिहासिक वस्तूंची विक्री, राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ अधिकारी, मोठा उद्योजक, वकील, न्यायाधीश, राजकारणी, व्याख्याता, कलाकार, ज्योतिषी, इंटिरिअर डिझायनर किंवा वास्तुरचनाकार, प्रशासक, एखाद्या संस्थेचे संचालक, प्राचीन लोकवस्ती आणि संस्कृतीशी निगडित व्यवसाय इत्यादी क्षेत्रे तुम्हाला अनुकूल असतील.
कौटुंबिक आयुष्य तुम्ही बहुधा आनंदी वैवाहिक आयुष्य जगाल. तुमची मुलेही नशीबवान अशतील. जोडीदार बऱ्यापैकी बुद्धिमान आणि घरातील दैनंदिन कामांमध्ये पटाईत असेल. तो/ती कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करतील.