नक्षत्र – 27 नक्षत्रांची नावे व त्यांची विशेषता राशी व त्यांचे स्वभाव
नक्षत्र – 27 नक्षत्रांची नावे व त्यांची विशेषता वैदिक ज्योतिषाच्या अनुसार नक्षत्र पंचागाचे खूप महत्वपूर्ण अंग असते. भारतीय ज्योतिषमध्ये, नक्षत्राला चंद्र महल ही सांगितले जाते. लोक ज्योतिषीय विश्लेषण आणि सटीक भविष्यवाणी साठी नक्षत्राच्या अवधारणेचा उपयोग करतात. शास्त्रामध्ये नक्षत्राची एकूण संख्या 27 सांगितली आहे. तर मग चला जाणून घेऊ या नक्षत्राचे नाव आणि त्यांच्या विशेषतेच्या बाबतीत विस्तारात –
अश्विनी नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही स्वभावाने बऱ्यापैकी उत्साही आणि क्रियाशील आहात. त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीच खूप उत्साही असता. मूलभूत गोष्टींनी तुम्हाला समाधान मिळत नाही आणि तुम्ही नेहमी काहीतरी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असता. आपले काम लवकरात लवकर संपवणे हे तुमच्या स्वभावातच आहे. वेग, उर्जा आणि क्रियाशीलता तुमच्यात स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली, तर तुम्ही लगेचच ती कल्पना अमलात आणता. तुम्ही खिलाडूवृत्तीचे आणि बुद्धिमान आहात. तुमचा सर्वात चांगला गुण म्हणजे तुम्ही सर्वकाही व्यवस्थित जाणून घेतल्यावरच योग्य तो निर्णय घेता. तुमच्या स्वभावातच एक प्रकारचा गुढपणा आहे, ज्यामुळे तुम्हाला धार्मिक, अलौकिक आणि गुप्त ज्ञानाबद्दल कुतूहल असते. तुम्ही बिनधास्त आणि धाडसी आहात, पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शत्रूकडून तुम्हाला फारसा त्रास संभवत नाही
शिक्षण आणि उत्पन्न
तुम्ही अष्टपैलू आहात. याचा अर्थ तुम्हाला बहुतेक प्रत्येक विषयाच्या बाबतीत थोडी माहिती निश्चित असेल. तुमच्या करिअरमध्ये शैक्षणिक विभाग तुमच्यासाठी उत्तम असेल. असे असले तरी तुम्ही औषधशास्त्र, सुरक्षा, पोलीस, लष्कर, गुप्त सेवा, अभियांत्रिकी, शिक्षक, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्येही प्रयत्न करू शकता. तत्त्वज्ञान आणि संगीताकडे तुमचा ओढा असेल आणि यातूनही तुम्हाला अर्थार्जन करता येऊ शकेल. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला अनेक चढउतार पाहावे लागतील.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे तुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. असे असले तरी तुमचे तुमच्या वडिलांशी काही वाद होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या आईकडील नातेवाईक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि परिवाराच्या बाहेरील लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल. तुम्हाला कन्यारत्नांपेक्षा पुत्ररत्न अधिक असतील.
राशी व त्यांचे स्वभाव वरती आश्विनी नक्षत्र पाहिले अत्ता त्या नक्षत्राची राशी म्हणजेच मेष राशी आपल्या राशिवरून आपला स्वभाव पडताळून पहा आणि त्या प्रमाणे जाणून घ्या राशी :- मेष स्वामी :- मंगळ देवता :- भगवान विष्णु जप मंत्र :- ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ल लं मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ते ३० अंशात पसरली आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्या, धीट, महत्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणार्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
कालपुरूषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्याचा पक्षाघात,नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
तुमचे जन्म नक्षत्र माहिती नसेल तर सचिस्तार माहिती साठी खालचा लिंक वरती जन्म तारिक पाठवा https://gurujisharad.com/kundali.php?service=Kundali_Dosh