श्रवण नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही सर्व काही व्यवस्थित आणि भराभर करता. तुमच्या आयुष्याची काही निश्चित तत्वे आहेत. तुम्हाला स्वच्छ, टापटीपिने रहाणे आवड्ते आणि स्वच्छतेची काळजी न घेणारे तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बेशिस्त लोक पाहिल्यावर त्यांना सूचना देता. दुस-यांचा त्रास पाहून तुम्ही पाघळता. तुम्हाला पाहुण्यांचे स्वागत करायला आणि चांगल्या भो्जनाचा आस्वाद घेणे आवडते.
तुम्ही धार्मिक आणि गुरूभक्त आहात. तुम्ही सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालता. एखाद्याला मदत करताना तुम्ही त्याच्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही.तुम्हाला लोक फसवू शकतात. तुमचे हास्य आकर्षक असते. त्यामुळेच तुम्ही जेव्हा कोणाला भेटता ते तुमचे फॅन होतात. कितीही चढ उतार आले तरी तुम्ही साधे आयुष्य जगत राहता. तुम्ही एक चांगले समुपदेशक आहात आणि लोकांना त्यांच्या समस्यांमध्ये मदत करता. तुम्ही जास्त शिकलेले नसलात तरी बहुकुशल(multi talented) असता. तसेच अनेक कामे एकावेळी करू शकता. तुमची जर वरच्या किंवा जास्त ताकदीच्या ठिकाणी नियुक्ती झाली तर तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील. खूपशा जबाबदा-यांमुळे तुमचा खूप खर्च होतो. कधीकधी आर्थिक अडचणही जाणवते. इतरांची सेवा करण्याचा चांगला गुण तुमच्यात आहे.
त्यामुळेच तुमची तुमच्या पालकांप्रतीही निष्ठा असते. तुमच्या वागण्यात चांगुलपणा आणि नैतिकता स्पष्ट दिसून येते. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही खूप विश्वासू असता कारण तुम्हाला चुकूनही कोणाचा विश्वास गमवायचा नसतो.तुमचा देवावर दृढ विश्वास असतो आणि तुम्ही नेहमी सत्य शोधण्याचा प्रयत्न करता. धर्म आणि अध्यात्म यामध्येही तुम्ही बरीच प्रसिध्दी आणि पैसा मिळवाल. तुमच्या स्वभावाचा हा विशेष आहे की तुम्ही सर्वकाही विचारपूर्वक करता.
त्यामुळे क्वचितच चुका करता. तुमची मानसिक ताकद चांगली असते ज्यामुळे तुम्ही अभ्यासात चांगले असता. तुम्ही सहनशील आणि आत्माभिमानी असता. तुम्ही शूर आणि धाडसी असता. काहीही असले तरी ते मनात न ठेवता तुम्ही स्पष्ट सांगून टाकता. उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून व्यवसाय आणि नोकरी दोन्ही तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यापैकी कोणतेही क्षेत्र तुम्ही निवडलेत तरी तुम्हाला यश मिळेल.
शिक्षण आणि उत्पन्न
वयाच्या ३०व्या वर्षापासून बदल होऊ लागतील. ३० ते ४५ पर्यंत सर्व स्थिरस्थावर होईल. तुमच्यासाठी योग्य व्यावसायिक क्षेत्रं मेकॅनिकल किंवा टेक्नीकल कामे, इंजिनीयरींग, पेट्रोलियम आणि तेल संबंधित कामे, शिकवणे, प्रशिक्षण, उपदेश,संशोधक, भाषांतरकार, गोष्टी सांगणारे, संगीत आणि चित्रपट संबंधित कामे, टेलिफोन ऑपरेटर, वृत्त निवेदक, रेडीओ आणि टेलिव्हिजन संबंधित कामे, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल आणि टूरिझम संबंधित कामे, हॉटेल आणि रेस्टॉरंट कामगार, सामाजिक कार्य इ.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे कौटुंबिक आयुष्य तसे आनंदाचे असेल. जोडीदार ब-यापैकी समंजस असेल. तो/ती तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल.