स्वाती नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही मेहेनती आहात आणि मेहेनतीच्या जोरावर यशस्वी होण्याचे धाडस तुमच्यात आहे. तुम्हाला आध्यात्माची खूप आवड आहे. तुम्ही एक सक्षम मुत्सद्दी आहात आणि तुमचा मेंदू राजकारणात तल्लखपणे काम करतो. राजकारणातील डावपेच तुम्हाला नवीन नाहीत. याच कारणामुळे तुम्ही नेहमी सतर्क आणि जागृत असता. मेहेनतीप्रमाणेच तुम्हाला व्यवहारज्ञानही तितकेच आहे, त्यामुळे तुमचे काम करून घेण्यात तुम्ही पटाईत आहात. तुमचा स्वभाव चांगला असल्यामुळे तुमचे लोकांशी संबंधसुद्धा चांगले आहेत. तुमच्या स्वभाव आणि वागणुकीमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही लोकांबदद्दल चांगला विचार करत असल्यामुळे तुम्हाला लोकांकडून सहकार्य मिळते आणि समाजात तुम्हाला प्रतिष्ठा असते. इतरांसाठी तुमच्या मनात दया आणि सहानुभूती असते.
तुम्ही स्वतंत्र बाण्याचे असल्यामुळे कसल्याही दबावाखाली काम करणे तुम्हाला रुचत नाही. त्यामुळेच काहीही करायचे असेल तरी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवे असते. नोकरी असो वा व्यवसाय, तुम्ही सगळीकडे यशस्वी व्हाल. त्यामुळे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीकोनातून तुमची परिस्थिती चांगली असेल. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये शिखर गाठण्यास तयार असता. प्रत्येक काम योजनाबद्ध रीतीने आणि अत्यंत संयमाने पार पाडता.
तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी घाई करत नाही. तुमच्या नेहमी हसतमुख असता. तुम्ही सामाजिक नियम आणि परंपरा मनापासून पाळता. तुमचे विचार शांततेचे, पक्के आणि स्वच्छ आहेत. त्यामुळेच तुमच्या कामावरील टीका तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. तुम्ही त्यांच्याकडूनही तशाच वागणुकीची अपेक्षा करता.
उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक संतुलन शाबूत ठेवले पाहिजे आणि रागावणे टाळले पाहिजे. तुम्ही नवीन विचारांचे स्वागत करता आणि नवीन गोष्टी शिकण्यास सदैव तयार असता. अशक्य ते शक्य करण्यासाठी तुम्ही खूप वेळ घालवता. जोपर्यंत तुमच्या स्वातंत्र्याला अडथळा निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मदत करण्यास सदा तत्पर असता. तुम्ही कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाचा आदर करता. तुम्ही गरजूंचे खूप चांगले मित्र असता आणि वाईट प्रवृत्तींची माणसे तुमचे शत्रू असतात. एकदा तुम्ही एखाद्याचा द्वेष करायला लागलात, की, ती भावना तुमच्या मनात कायमस्वरुपी राहते. कदाचित तुमचे बालपण खूप खडतर गेले असावे. तुम्ही खंबीर आणि मेहेनती आहात, पण तुम्ही स्वत:वर नियंत्रण नाही ठेवले तर आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
योग्य पावले उचलून परिस्थित नियंत्रणात आणणे तुम्ही शिकले पाहिजे.