ख्रिसमस नाताळ
नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा होतो. या दिवशी जिसस क्राइ्र्रस्ट म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. येशुख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. येशुंना देवाची एकमेव संतान मानले जाते. त्याकाळातील शासन कर्त्यांना येशुख्रिस्तांचा हा संदेश पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी येशु ख्रिस्तांना सुळावर लटकवले आणि मारून टाकले. त्यानंतर येशु ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात.
नाताळ च्या सणाला ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पध्दतीने सजवितात. ख्रिसमस येण्यापुर्वी कितीतरी अगोदर त्याची तयारी सुरू होते. बाजारांमधला झगमगाट आणि रोषणाई या दिवसांमधे पाहाण्यासारखी असते. अनेक शाळांना या दरम्यान आठ दिवसांची सुट्टी देखील असते.
गोवा या ठिकाणी तर नाताळची धुम फार अनोख्या पध्दतीने पहायला मिळते. हा सण साजरा करण्याकरता कित्येक पर्यटक देश विदेशातुन आणि आपल्या भारतातुन देखील गोवा येथे येतात. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतात. गोव्याचे समुद्रकिनारे तर माणसांच्या गर्दीने फुलुन जातात. गोवा येथे अनेक जुने चर्चेस देखील आहेत त्यामुळे सुध्दा येथील नाताळ फार रंगीबेरंगी पध्दतीने साजरा होतांना दिसतो.
नाताळच्या दिवशी चर्च मधे विशेष प्रार्थना होते. माणसं आपल्या नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरता एकमेकांकडे जातात, भेटवस्तंुचे आदानप्रदान होते.
ख्रिसमसच्या दिवशी आपल्या अंगणात ख्रिसमस ट्रि लावल्या जातात त्याला देखणं रूप दिलं जातं. घरावर रोषणाई केली जाते. या दिवशी केकचे विशेष महत्व असते. आलेल्यांना केक भरवणे फार जुनी परंपरा आहे एकमेकांना केक भरवुन नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात.
आईवडिल आपल्या मुलांकरता आणलेल्या भेटवस्तु सांताक्लाॅजने आणल्याचे सांगतात. सांताक्लाॅजच्या रूपातील व्यक्ती लहान मुलांना भेटवस्तु देतो त्यामुळे मुलं फार आनंदी होतात. सांताक्लाॅजबद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल, आश्चर्य आणि कौतुक आजदेखील पहायला मिळतं. सांताक्लाॅज स्वर्गातुन येतो आणि येतांना प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी आणतो असा एक समज आहे.
ख्रिसमस हा सण दरवर्षी डिसेंबर महिना संपतांना येतो त्याची 25 तारीख ही ठरलेलीच. ख्रिसमस येण्यापुर्वीपासुन चर्चमध्ये अनेक कार्यक्रम सुरू होतात जे नववर्ष आगमनापर्यंत सुरूच असतात. या कार्यक्रमांमधे प्रभु येशु च्या जन्मप्रसंगाची नाटीका सादर केली जाते. प्रभु येशुची गितं गायली जातात. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात व प्रार्थना म्हंटल्या जाते.
सांताक्लाॅज ची गोष्ट – Santa Claus History
सांताक्लाॅजची परंपरा कशी सुरू झाली याची एक कथा सांगीतली जाते ती अशी… एका नगरात निकुलस नावाचा श्रीमंत माणुस राहायचा. तो केवळ पैशानेच श्रीमंत होता असे नव्हें तर मनाने देखील श्रीमंत होता. त्याच्या हृदयात सगळयांकरता दया आणि करूणा होती.
एकदा रस्त्याने फेरफटका मारत असतांना एका घरातुन त्याला आवाज येतो तो आवाज एका लहान मुलीचा असतो ती आपल्या वडलांना म्हणत असते की आई फार आजारी आहे तीच्याकरता औषधी कशी आणायची? घरात खाण्याचे सामान आणण्याकरता देखील पैसे उरले नाहीत.
एवढे बोलुन ती रडु लागते… तिची ती अवस्था पाहुन निकोलसला तिची दया येते आणि तो गुपचुप रात्री येऊन तिच्या दारात खाण्याचे जिन्नस व काही चांदीचे शिक्के ठेवुन जातो.
ज्यावेळेस ते सामान ती मुलगी आणि तिचे वडील पहातात त्यावेळी प्रभुची आपल्यावर कृपा झाल्याचा त्यांचा ठाम विश्वास होतो… ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली… गरजवंत लोकांनी आपापल्या घराबाहेर देखील पिशव्या टांगुन ठेवल्या… निकोलस ने ते पाहुन ठरवले की मी कोणालाही निराश करणार नाही व त्याने प्रत्येकाच्या पिशव्यांमधे काही ना काही वस्तु किंवा पैसे, खाण्याचे सामान अश्या प्रकारच्या गोष्टी टाकल्या.
काही काळ लोटल्यावर लोकांना निकोलस हे सर्व करतोय हे कळालं आणि तेव्हांपासुन लोक त्याला सेण्ट निकोलस असे म्हणुं लागले…. संत निकोलस हळुहळु सांताक्लाॅज या नावाने सुप्रसीध्द झाला.
Leave a Comment