एकादशी (हरिदिनी)
अधिक माहिती साठी क्लिक करा सद्गुरु शक्ती ज्योतिष कार्यालय
‘ललिताने कामदा एकादशीचा उपवास करून प्रार्थना करताच पती ललितचे पाप नष्ट झाले. त्याचा राक्षसभाव निघून जाऊन त्याने दिव्य देह धारण केला आणि तो पुन्हा गंधर्व बनला.’ – ऋषी प्रसाद (एप्रिल २०११)
५. एकादशी व्रताचे महत्त्व
अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
आ. ‘एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६. एकादशीचा उपवास
‘पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.’ – ‘मासिक ऋषीप्रसाद’, ऑगस्ट २००८
७. एकादशीचे लाभ
‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.
स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड
अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला ‘हरिदिन’ म्हणजे विष्णूचा दिवस, असे संबोधतात.
८. एकादशीला आणि इतर दिवशी तुळस पाहणे
इतर दिवशी तुळस पाहणे | एकादशीला तुळस पाहणे | |
१. चैतन्याचे प्रक्षेपण | अल्प | अधिक |
२. विष्णुतत्त्व | ||
२ अ. स्तर | अकार्यरत-कार्यरत | कार्यरत-अकार्यरत |
२ आ. परिणाम | व्यक्ती आणि वायूमंडल यांवर थोड्या प्रमाणात परिणाम होणे | व्यक्ती आणि वायूमंडल यांवर जास्त परिणाम होणे |
३. आनंद आणि शांती यांचे प्रमाण | अल्प | अधिक |
४. सुगंधाचे प्रमाण | अल्प | अधिक |
५. उपाय करण्याचे सामर्थ्य | अल्प | अधिक |
६. वाईट शक्तींचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता | अल्प, भुवलोकातील आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे | अधिक, भुवलोक ते दुसर्या पाताळापर्यंतचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे |
Leave a Comment