सात्त्विक वास्तू
६. चैतन्य, सुंदरता आणि उत्साहवर्धक वातावरण यांनी युक्त सनातनच्या वास्तू !
सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात. त्यामुळे तेथे प्रचंड सात्त्विकता, चैतन्य आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे, तर आसपासचा निसर्गही अनुकूल आहे. ज्यामध्ये आंब्याच्या झाडाची आश्रमाजवळील बाजू आश्रमाजवळ झुकलेली आढळते. फुलझाडांना पुष्कळ फुले येतात आणि ती आश्रमाच्या बाजूने कललेली असतात, तर फळझाडांना पुष्कळ फळे येतात.
आश्रमातील लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत आणि काही लाद्यांवर पाण्यात दिसते तसे प्रतिबिंब दिसते. आश्रमातील लाद्यांवर ‘ॐ’ आणि दैवी चिन्हे उमटली आहेत.
अधिक माहिती वाचण्यासाठी भेट द्या … सद्गुरु शक्ती ज्योतिष कार्यालयात
७. वास्तूची स्वच्छता व्यवस्थित करा !
स्वच्छतेचे नियोजन महिन्यातून एकदा करावे. तेव्हा वास्तूतील अनावश्यक साहित्य काढून टाकावे. नियमित स्वच्छतेमध्ये ज्या कृती करू शकत नाही, त्या सामूहिक स्वच्छतेच्या वेळी कराव्यात. बहुतांश घरांमध्ये कामवाली बाई झाडणे-पुसणे करते. वास्तूदेवतेची कृपादृष्टी रहाण्यासाठी स्वच्छता चांगल्या प्रकारे प्रतिदिन करावीच; मात्र मासातून एकदा व्यवस्थित करावी.
८. देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !
काही जण ‘नवीन घराला नाव देण्याविषयी काही शास्त्र आहे का’, असे साधकांना विचारतात. देवतांची नावे सर्वाधिक सात्त्विक आणि चैतन्ययुक्त असल्याने घराला देवतेचे नाव देणे सर्वांत योग्य ठरते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते. अशा घरात अस्वच्छता असणे, आदळआपट करणे, भांडणे होणे, रज-तमप्रधान संगीत ऐकणे, मांसाहार करणे इत्यादी कृतींमुळे घरातील देवत्वाचा अपमान होतो. घराला देवतेचे नाव ठेवणार्यांनी घराचे पावित्र्य देवालयासारखे जपले, तरच त्यांची साधना होते.’
९. घर किंवा सदनिका विकत घेतांना तिच्यातील स्पंदने चांगली असल्यासच ती घ्या !
‘एखादे घर किंवा सदनिका विकत घेतांना केवळ कोणत्या भागात घर/सदनिका आहे ? इमारत किती जुनी आहे ? बांधकाम कसे आहे ? किंमत किती आहे ? इत्यादी सूत्रांच्या विचारासोबत ‘वास्तूत त्रासदायक स्पंदने नाहीत ना ? चांगली स्पंदने आहेत का ?’, या सूत्रांचा प्राधान्याने विचार करा. स्पंदने चांगली नसली आणि ‘इतर सर्व घटक पूरक आहेत’, असे असले, तरी ती वास्तू घेऊ नका. तिच्यामुळे त्रास होईल. मनःस्वास्थ्य चांगले रहाणार नाही. प्रकृती ठीक रहाणार नाही. वास्तूत चांगली स्पंदने नसल्यास शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी सर्वच विषयांच्या संदर्भात त्रास होण्याची शक्यता असते. तो त्रास दूर करण्यासाठी अनेक विधी करावे लागतात, तसेच बरीच साधनाही व्यर्थ होते. त्यात अनेक वर्षे जातात.
रहात असलेल्या वास्तूत जराशी किंवा मध्यम त्रासदायक स्पंदने असल्यास त्यासाठी उपाय करावेत. त्रास तीव्र असल्यास ती वास्तू सोडून दुसरीकडे रहायला जावे.’ अथवा त्या वास्तूचे जाणकारांकडून वास्तू परीक्षण करून घ्यावे
Leave a Comment