गणेश चतुर्थी
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते.
Leave a Comment