
साप्ताहिक राशी भविष्य
राशी भविष्या-मेष (१५ जून ते २१ जून)
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. काहींना अपघातभय राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तडकाफडकी निर्णयातून नुकसान होईल. प्रवास फायदेशीर. मित्रांशी वाद. शुभ ता. १७, १८, २१.
आधिक वार्षिक राशी भविष्य जाणून घ्या क्लिक करा
वृषभ राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
कौटुंबिक कार्याचे नियोजन. संततीला नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना यशदायी काळ. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरुन वादाचे प्रसंग. जोडिदाराच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नौकरीत मनासारख्या घटना. प्रवासात संमिश्रता राहील. शुभ ता. १७, १८, १९, २०.
मिथुन राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत गूढ घटना. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळलेले जास्त चांगले. शुभ ता. १९, २०, २१.
कर्क राशी भविष्य( १५ जून ते २१ जून)
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत संमिश्र परिणाम मिळतील. आर्थिक समन्वय साधणे कठीण जाईल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. जोडीदाराला शारिरिक कटकटी. संततीमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभदायक. शुभ ता. १५, १६, २१.
आधिक वार्षिक राशी भविष्य जाणून घ्या क्लिक करा
सिंह राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
कन्या राशी भविष्य( १५ जून ते २१ जून)
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामे होतील. संततीला वाहनांपासून धोका राहील. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. मध्यस्थी मधून मनस्ताप होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामातून सफलता मिळेल. वडिलांचा सल्ला हितकारक राहील. शुभ ता. १७, १८, १९, २०.
आधिक वार्षिक राशी भविष्य जाणून घ्या क्लिक करा
तुळ राशी भविष्य( १५ जून ते २१ जून)
व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण घटेल. नौकरदारांना दिलासा देणाऱ्या बातम्या. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. कौटुंबिक मनाविरुद्ध खर्चाचे प्रसंग येतील. भावंडांबरोबर वाद होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. १९, २०, २१
वृश्चिक राशी भविष्य( १५ जून ते २१ जून)
संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. अविवेकी वागण्यातून नुकसानीचे प्रसंग. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये सामंजस्य फायद्याचे राहील. सरकारी कामात व्यत्यय येतील. प्रवासात अडचणी निर्माण होतील. शुभ ता. १५, १६, २१.
धनु राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीवर सर्व बाबतीत नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराला भावंडांमुळे अडचणी येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. काहींना मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. मित्रांचे सहकार्य चांगले राहील. शुभ ता. १७, १८.
मकर राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची उत्तम साथ. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. वाहने जपून चालवावीत. सासुरवाडीत अडचणी. सरकारी कामात यश मिळेल. नौकरांविषयीच्या समस्येतून मार्ग निघतील. शुभ ता. १५, १६, १९ २०.
कुंभ राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
जोडीदाराबरोबर सतत वादाचे प्रसंग येतील. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी. सततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विदयार्थ्यांना मनाप्रमाणे यश. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सहकार्य फायद्याचे. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. ओटी-पोटाचे विकार त्रास देतील. शुभ ता. १७, १८, २१.
मीन राशी भविष्य ( १५ जून ते २१ जून)
Leave a Comment