धर्म शास्त्र शंका समाधान
आपणासाठी हे महत्वाचे व अनुकरण आवश्यक . ◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये.
उत्तर :-ती यमाची मृत्यू ची दिशा आहे यमाची पुजा केली जात नाही फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो
◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये.
उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून
◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी.
उत्तर :- ब्रम्हरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्या साठी टोपी काढावी
◆ शिवपिंडाला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
उत्तर :-शिवसुत्र आहे महादेवाचे रद्रगण,पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात त्याना प्रदक्षिणा होईल. म्हणून
◆ एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत.
उत्तर :-प्रत्येक गोष्टीतएक तत्व असते आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून
◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये.
उत्तर :-हा मंत्रराज आहे,ज्या मंत्राना बिज असतात ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायची असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो ,अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून
◆ शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत
उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उव्देग, कलह प्राप्त होतो म्हणून
◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्रका घालू नये.
उत्तर :-तूप हे सत्व तत्व,व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे म्हणूनहे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तम तत्त्व वाढेल राक्षसी संकटे येतील म्हणून
◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत
उत्तर:-त्याच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून
◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये.
उरते:-फुले ही देवतांची पवित्रके आहेत विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून
◆ शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजू नये
उत्तर :-शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्त्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनाद ही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही ती हिरण्यगर्भा आहे ती प्रसूति वैराग्य आहे
◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसर्यास वापरण्यास का देवू नये.
उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसरयास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो
◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे
उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा -आत्मा/ तर्जनी -पितर/मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /म्हणून देव बोटानेच देवाला गंध
◆ समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर :-विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्या कडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून
◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर :-पितराना दोष लागतो म्हणून
◆ उंबर्यावर बसून काशिंकू नये.
उबरा हा मुळात बसण्या साठी नाही तेथे सर्वतिर्थे बसताता तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तीला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे
◆ निजलेल्या माणसास का
ओलांडून जावू नये.
उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून
◆ मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून
◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुसर्यास का देवू नयेत.
उत्तर :-याच्यात करणीतत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून
◆ सायंकाळी केर का काढु नये
उत्तर :-लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते
◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा
◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे
उत्तर :-येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते
◆ एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्त्वाचा नाही
माहिती संग्रहीत सद्गुरू शक्ती ज्योतिष कार्यालय पत्रिका मार्गदर्शन नी शुल्कासह केले जाईल