वर्ष २०२२ मधील शनि ग्रह पालट (शनि ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश) !
चैत्र कृष्ण चतुर्दशी (शुक्रवार, २९.४.२०२२) या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी पहाटे ४.५७ पासून सकाळी १०.४५ वाजेपर्यंत आहे. २९.४.२०२२ या दिवसापासून मीन राशीला साडेसाती चालू होत आहे. मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती आहे. (या दिवशी धनु राशीची साडेसाती खंडित होत असून ती पुन्हा १२.७.२०२२ या दिवशी चालू होत आहे.)’
१. शनि ग्रह पालटाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व
१ अ. शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे
मिळत नसून शेवटच्या ६ मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवत असणे
चैत्र कृष्ण चतुर्दशी, शुक्रवार, २९.४.२०२२ या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या पुण्यकालात ‘जप, दान, पूजा करणे’, हे पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे. शनि ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याचा हा संधीकाल आहे. संधीकालातील साधनेचे फळ अनेक पटींनी अधिक मिळते. शनि ग्रहाला ‘मंद ग्रह’ म्हणतात; कारण तो एका राशीत अडीच वर्षे असतो. तो पालटानंतर लगेच त्याची चांगली अथवा वाईट फळे मिळत नाहीत, तर शेवटच्या ६ मासांत त्याचे अनुभव जाणवतात.
१ आ. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होणे
कुंभ ही शनीची स्वरास असल्याने कुंभ राशीत शनीचे आगमन शुभ असणार आहे. शनि हा ग्रह कर्माचा अधिपती असून तो अहंकार नाहीसा करतो. शनि हा संवेदनेचा कारक ग्रह आहे. शनि हा चिंतनशील ग्रह असल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणाऱ्या साधकांना साधनेच्या प्रयत्नांत यश देतो. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होते.
२. शनि ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व
२ अ. शनि हा पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह असणे
हिंदु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर आणि कुंभ या शनि ग्रहाच्या राशी आहेत. शनि तूळ राशीत उच्चीचा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा उच्च राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. शनि हा ग्रह वायुतत्त्वाचा असून मनुष्याला आसक्तीकडून विरक्तीकडे नेतो. मानवी जीवनातील मान, अपमान आणि अवहेलना यांतून हा ग्रह मानवाला परमार्थाकडे वळवतो. हा पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह आहे.
२ आ. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक
असून अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसणे
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) आणि अशुभ (दोष), अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभ अथवा केवळ शुभ असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्हणूनच लोकांच्या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते. शनि ग्रह गर्व, अहंकार आणि पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणुसकी शिकवतो अन् अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील आणि नम्र आहेत, त्यांना शनि उच्च पदाला घेऊन जातो, तर जे अहंकारी, गर्विष्ठ अन् स्वार्थी आहेत, त्यांना शनि त्रास देतो. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. या काळात व्यक्तीला स्वकीय-परकीय यांची जाणीव होते, स्वतःचे गुण-दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो, माणुसकीची जाणीव होते, ‘एक माणूस म्हणून कसे जगावे ?’, याचे ज्ञान होते. शनि ग्रहाला ‘न्यायदेवता’ म्हणतात. अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसतात.
३. राशीपरत्वे शनीची स्थाने
‘कुंभ राशीत प्रवेश करणारा शनि कुंभ राशीस पहिला, मकर राशीस दुसरा, धनु राशीस तिसरा, वृश्चिक राशीस चौथा, तूळ राशीस पाचवा, कन्या राशीस सहावा, सिंह राशीस सातवा, कर्क राशीस आठवा, मिथुन राशीस नववा, वृषभ राशीस दहावा, मेष राशीस अकरावा आणि मीन राशीस बारावा आहे.
४. शनि पालट झाल्यावर शनि
प्रत्येक राशीत कोणत्या पादाने प्रवेश करतो आणि त्याचे फल
ध्यान
अहो सौराष्ट्रसञ्जात छायापुत्र चतुर्भुज ।
कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुर्धर ।।
त्रिशूलिश्च समागच्छ वरदो गृध्रवाहन ।
प्रजापते तु संपूज्य: सरोजे पश्चिमे दले ।।
अर्थ : शनिदेवाने सौराष्ट्रदेशी अवतार घेतला. तो सूर्य आणि छायादेवी यांचा पुत्र होय. त्याला ४ हात आहेत. तो रंगाने काळा आहे. त्याच्या एका हातात धनुष्य, एका हातात बाण आणि एका हातात त्रिशूळ आहे. त्याचा चौथा हात वर देणारा आहे. ‘गिधाड’ हे त्याचे वाहन आहे. तो सर्व प्रजेचा पालनकर्ता आहे. नवग्रहांच्या कमळामध्ये त्याची स्थापना मागच्या पाकळीच्या ठिकाणी केली जाते. अशा या शनिदेवाची आराधना करावी.
६ ऊ. दानाचा श्लोक
शनैश्चरप्रीतिकरं दानं पीडानिवारकम् ।
सर्वापत्तिविनाशाय द्विजाग्याय ददाम्यहम् ।।
अर्थ : शनिदेवाला प्रिय असे दान दिल्यावर पिडांचे, तसेच सर्व आपत्तींचे निवारण होते. असे हे दान मी श्रेष्ठ अशा ब्राह्मणाला देत आहे.\
६ ए. शनिस्तोत्र
कोणस्थ: पिङ्गलो बभ्रु: कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।
सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ।।
एतानि दश नामानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
शनैश्वरकृता पीडा न कदाचित् भविष्यति ।।
पिप्पलाद उवाच ।
नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तुते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तुते ।। १ ।।
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ।। २ ।।
नमस्ते मन्दसंज्ञाय शनैश्चर नमोऽस्तुते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ।। ३ ।।
अर्थ : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्चर आणि मंद या १० नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही १० नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला शनिग्रहाची बाधा कधीही होणार नाही.
पिप्पलादऋषि म्हणतात, ‘‘हे कोनात रहाणाऱ्या कोणस्था, हे पिंगला, हे बभ्रु, हे कृष्णा, हे रौद्रदेहा, हे अंतका, हे यमा, हे सौरी, हे विभो, हे मंदा, हे शनिदेवा, मी तुला नमस्कार करतो. मी दीन तुला शरण आलो आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो.’’
हे स्तोत्र नित्य प्रातःकाळी पठण करावे.
७. साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय
अ. ‘ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे.
आ. शनीच्या साडेसातीप्रीत्यर्थ जप, दान आणि पूजा अवश्य करावी.
इ. पीडापरिहारार्थ शनिवारी अभ्यंग स्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे.
ई. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद-मीठ शनीस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पीडेचा परिहार (उपाय) होईल. ती न मिळाल्यास निळ्या रंगाची, उदा. गोकर्ण, कृष्णकमळ, अस्टर इत्यादी फुले वहावीत.
उ. शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त असावे.
ऊ. नीलमण्याची अंगठी धारण करावी.’
सविस्तर माहिती साठी आपल्या जवळच्या जाणकार गुरुजींना विचारून उपाय करा
Leave a Comment