तुळशी माळा विषयी जाणून घ्या ....
तुळशी माळा
₹ 300
भारतीय संस्कृतीने तुळशीशिवाय इतर कोणत्याही लहानमोठ्या वनस्पतीला दैनंदिन पूजेचे-देवतेचे स्थान दिलेले नाही. जपा साठी सर्वात जास्त महत्व सांगितले आहे.नास्तिकाला आस्तिक व अश्रद्धाला सश्रद्ध करण्याचे प्रचंड व अनुभूत सामर्थ्य फक्त आणि फक्त तुळशीतच असते
याची जाणतेपणी व साक्षेपाने नोंद घ्यावी. वड, पिंपळ व औदुंबर हे वृक्षही देवतुल्य मानले जात असले तरी, तुळशीचा दर्जा त्यांना नसतो. शिवाय तुळस, तिचे रोप, तिचे दर्शन हे ‘सर्वजनसुलभ’ व कोठेही सहज उपलब्ध असणे, हा आणखी एक तिचा विशेष.याच्या घरात, कुंडीत, बागेत तुळस व गळ्यात माळ असते. तो मनुष्य कितीही तामसी, क्रोधी, विकारवश असला तरी, तो हळूहळू, क्रमशः पण निश्चितीने शांत-उपशांत, सात्त्विक, प्रसन्न, तृप्त व समाधानी झालाच पाहिजे असा आजवरचा अनेकांचा प्रत्यक्षानुभवच आहे. सहज साध्या सोप्या गोष्टींपासून अतिशहाणपणापायी लोकांनी आपले नुकसान व अकल्याण करू नये म्हणून मुद्दाम हा येथे हितोपदेश केला आहे, याची नोंद घ्यावी.
वारी हे जसे साधन असते तसेच तुळशीची माळ गळ्यात घालून घेणे हेही साधनच असते. माळ घातली की कृतार्थता येत नाही की, महामंत्राचा माळेवर जप केल्याचे लगेच विठ्ठलदर्शनही होत नाही व होतही नसते; परंतु या साधनांमुळे व साधनामार्गामुळे, मनुष्यजन्माचे, ‘याचि देही याचि डोळां।’ सार्थक केलेच पाहिजे, आपण मनुष्य असून मनुष्यधर्माने वागून सतत व अखंडितपणे सत्कर्म-सत्कार्य केलेच पाहिजे, अशी सत्प्रेरणा मात्र निश्चित होते, याचे स्मरण असो द्यावे. गळ्यातील तुळशीची माळच त्या सश्रद्ध वारकऱ्याला प्रेरणा देते :-होईन भिकारी। पंढरीचा वारकरी।। हाचि माझा नेमधर्म। अवघे विठोबाचे नाम।।’
टीपः प्रतिमा वास्तविक उत्पादनाचे प्रतिनिधित्व करते जरी प्रतिमा आणि उत्पादनाचे रंग किंचित भिन्न असू शकतात.