महालय श्राद्ध
पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते. म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.
नवमीच्या दिवशी ब्रह्मांडात रजोगुणी पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित शिवलहरींचे आधिक्य असल्याने या लहरींच्या साहाय्याने श्राद्धातून प्रक्षेपित होणार्या मंत्रोच्चारयुक्त लहरी शिवरूपाने ग्रहण करण्याचे सूक्ष्म बळ त्या त्या सुवासिनीच्या लिंगदेहाला प्राप्त होते. या दिवशी कार्यरत असणारा शिवलहरींचा पृथ्वी आणि आप तत्त्वात्मक प्रवाह त्या त्या लिंगदेहात आवश्यक त्या लहरी झिरपवण्यास पोषक अन् पूरक ठरतो.
या दिवशी सुवासिनीतील शक्तीतत्त्वाशी सूक्ष्म शिवशक्तीचा संयोग होण्यास साहाय्य झाल्याने सुवासिनीचा लिंगदेह लगेच पुढील गती धारण करतो. या दिवशी असणार्या शिवलहरींच्या आधिक्यामुळे सुवासिनीला सूक्ष्मरूपी शिवतत्त्वाचे बळ प्राप्त होऊन तिचे स्थूल शिवरूपी पुरुषप्रकृतीशी जोडलेले पृथ्वीवरील संस्कारांशी निगडित घनिष्ट आसक्तीयुक्त धागे विघटित होण्यास साहाय्य झाल्या
दिवशी असणार्या शिवलहरींच्या आधिक्यामुळे सुवासिनीला सूक्ष्मरूपी शिवतत्त्वाचे बळ प्राप्त होऊन तिचे स्थूल शिवरूपी पुरुषप्रकृतीशी जोडलेले पृथ्वीवरील संस्कारांशी निगडित घनिष्ट आसक्तीयुक्त धागे विघटित होण्यास साहाय्य झाल्याने ती पतीबंधनातून मुक्त होण्यास साहाय्य होते. म्हणून रजोगुणी शक्तीरूपाचे प्रतीक असलेल्या सुवासिनींचे श्राद्ध महालयातील शिवलहरींचे आधिक्य दर्शवणार्या नवमीलाच करतात.’