वास्तू शास्त्र व इथे ठेवा दहीभात घरातली पीडा दूर जाईल आणि सुख दोन्ही मिळेल…
नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सतत काहींना काही कुरबुरी चालत असतील, सतत भांडणे होत असतील, आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घरात माता लक्ष्मी टिकत नसेल, पैसा जर टिकत नसेल, तर आपण ही घरातील पिडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो.
त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी दही आणि दुसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे थोडेसे तांदूळ…कोणतेही तांदूळ आपण यासाठी वापरू शकता. मित्रांनो आपल्या घराशेजारी दृश्य अदृश्य शक्ती वावरत असतात. या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर कळत न कळत होतं असतो.
काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काही जणांना हा प्रभाव जाणवत नाही. या शक्तींच्या प्रभावामुळेच आपल्या घरावरती काही संकटे येतात. अनेक प्रकारच्या समस्या येतात. बऱ्याचदा तर अस होत की काहींना हातामध्ये आलेला पैसा सुद्धा हातातून निघून जातो. तर या सगळ्यासाठी दृश्य अदृश्य गोष्टीचा हात त्यामागे असतो.
तर या शक्तींना प्रसन्न करावं लागतं त्या शक्तींना खुश ठेवावं लागतं. आणि त्यासाठी वास्तुशास्त्र, जोतिषशास्त्र, तसेच समुद्रशास्त्रमध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातीलच अतिशय सोपा मार्ग की जो प्रत्येक जण करू शकतो. तो म्हणजे दही आणि भाताचा उपाय.. ज्या प्रकारे या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहचवतात तसेच या शक्ती तुम्हाला खुश सुद्धा ठेव शकतात.
>तुमच्या जीवनामध्ये आनंद सुद्धा भरू शकतात. बऱ्याच जणांना अगदी अनपेक्षितपणे लॉटरी लागते, काही जणांच्या कडे अचानकपणे नोकरीचे योग्य येतात, यामागे त्यांनी केलेली अश्या प्रकारचे काही कृत्य असतात. त्यामुळे त्या दृश्य अदृश्य शक्ती प्रसन्न होतात. तर या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आज आपण एक उपाय घेऊन आलो आहोत.
यासाठी आपण घरी तयार केलेलं ताज दही घ्यायचं आहे. आणि तांदळाचा आपल्याला भात बनवायचा आहे. आणि नंतर आपण दही आणि शिजवलेला भात एकत्रीत करायचा आहे. आणि हा जो दही भात आहे तो आपल्याला आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे.
यासाठी तुम्ही दिवसातील कोणतीही वेळ निवडू शकता. त्यावेळी आपण हा दही भात घराबाहेर ठेवणार आहोत. आपल्याला हा दही भात अश्या ठिकाणी ठेवायचा आहे जिथे शक्यतो पाळीव प्राण्यांना खाता येईल. किंव्हा पक्षी असतील. त्यांना हा दही भात सहज खाता येईल. अश्या ठिकाणी आपल्याला हा दही भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे.
तर तो ठेवल्यानंतर काही वेळाने निरीक्षण करा अगदी तीन ते चार तास उलटून जाऊदेत हा दही भात प्राण्यांनी पक्ष्यांना खाऊ देत. जर हा दही भात त्यांनी पूर्ण संपवला तर समजून जा की आपल्या घरामध्ये पिडा आहे. जर त्यांनी हा दही भात खाऊन संपवला नाही तर आपल्या घरामध्ये पिडा नाही. म्हणजे या दृश्य अदृश्य शक्तींमुळे आपल्या घराच नुकसान होत नाही. अश्या प्रकारे आपल्याला या गोष्टीचा वापर करत येईल.
या पाठीमागचा शास्त्र अस आहे की हे जे दही आहे हे शक्यतो गाईच्या दुधापासून बनलेलं असावं. गाईच्या दुधापासून जर बनवलेलं दही असेल तर आपल्याला परिमाण तात्काळ मिळतात. याच कारण अस आहे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्त पेशी सुद्धा आलेल्या असतात. आणि अस हे गाईंच्या रक्त पेशी पासून तयार झालेलं दही ज्या वेळी आपण प्राण्यांना पशूंना खायला घराबाहेर ठेवतो त्या वेळी या दही चा स्पर्श हा आपल्या घरातील शक्तींना आपोआप होत असतो.
एक प्रकारे आपण अदृश्यपणे रक्त त्या शक्तींवर शिंपडत आहोत. असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या मुळे कोणत्याही प्राण्याचा बळी न घेता. ह्या शक्ती आपल्यावर प्रसन्न होतात.आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरातील पिडा कमी होते निघून जाते. तर मित्रानो हा उपाय आपण दररोज करा. आणखी एक महत्वाचा म्हणजे हे करत असताना आपण कोणतीही हत्या करणार नाही म्हणजे कोणाचाही बळी देणार नाही याची काळजी घायची आहे. जर आपण अस केलत तर तुम्हाला काही दिवसातच कळेल की आपल्या घरातील पिडा कमी होतील, घरातील वाद कमी होतील, घरामध्ये सुखशांती नांदेल..पैसे घरात टिकतील, ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळेल..तर हा उपाय तुम्ही नक्की करा…. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज �