उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची भविष्यवाणी
तुमच्यात प्रचंड उर्जा आहे आणि तुम्हाला सर्व काम स्मार्टपणे करायला आवडते. तुम्ही सतत सक्रीय असता हा तुमचा गुण म्हणावा लागेल. समाजसेवेतून तुम्हाला आदर मिळेल. भविष्याची योजना आखण्यात तुम्ही तज्ज्ञ आहात. याच गुणामुळे तुम्ही कदाचित राजकारणात यशस्वी होऊ शकता. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला लहानसहान गोष्टी करायला आवडत नाहीत. त्याचप्रमाणे आपले कार्यक्षेत्र वारंवार बदलणे तुम्हाला आवडत नाही कारण तुम्हाला स्थैर्य प्राप्त झालेल्या गोष्टी करायला आवडतात. तुम्हाला सरकारी खात्यांकडून जास्त लाभ होतील. तुम्ही एखाद्याशी मैत्री करता तेव्हा ती दीर्घकाळासाठी असते. तुम्ही नेहमी काही ना काही शिकायला तयार असता आणि याच गुणामुळे तुम्ही यशस्वी होता. त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी आनंदी आणि संतुष्ट असता आणि काही बाबतीत खूप नशीब�
तुमच्या संपत्ती आणि सत्तेचा वापर करून तुम्हाला लोकांना मदत करायची संधी तुम्ही सोडत नाही. तुम्ही बचत करण्यातही सक्षम आहात. त्याचप्रमाणे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र आहात. जनसंपर्काशी संबंधित कामांमधून तुम्हाला लाभ होऊ शकेल. तुम्ही कष्ट करायला कधीही कचरत नाही, त्यामुळे तुम्हाला यश मिळते. वयाच्या ३२व्या वर्षापर्यंत तुमचे आयुष्य थोडेसे खडतर असेल, पण वयाच्या ३८ व्या वर्षानंतर तुम्ही समृद्ध व्हाल.
शिक्षण आणि उत्पन्न शिक्षकी पेशा, लेखन, वैज्ञानिक संशोधन या कार्यक्षेत्रांमध्ये तुमचे गुण उचळून निघतली. राजकारण, संगीत, क्रीडा, वरिष्ठ अधिकारी पद, खासदार किंवा मंत्री, माध्यमांशी किंवा जनसंपर्काशी निगडीत काम, मनोरंजन, पुजारी, धर्मगुरू, व्याख्याता, वित्तविभाग, समाजसेवा, विवाह जुळवणी केंद्र, गणितज्ज्ञ, किंवा विज्ञानाशी संबंधित क्षेत्रे, अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, जाहिरात क्षेत्र, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रे तुम्हाला अनुकूल आहेत.
कौटुंबिक आयुष्य तुमचे कौटुंबिक आयुष्य चांगले आहे. तुम्हाला संतुष्ट राहायला आवडत असल्यामुळे तुम्ही तुमच्या कौटुंबिक आयुष्यात सुखी आहात. घरकामांमध्ये तुमचा जोडीदार पटाइत आहे आणि शांत स्वभावाचा आणि मृदूभाषी आहे. त्याला गणित किंवा विज्ञानात रुची आहे आणि शिक्षण आणि प्रशासन यात यश मिळू शकते. तो/ती अभिनय किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकेल. त्यांना दिखाऊपणा पसंत नाही.