अश्लेषा नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही नशीबवान आहात आणि तुमचा बांधा सुदृढ आहे. तुमच्या वकृत्त्वाने प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. लोकांसोबत एखाद्या विषयावर चर्चा करायची तुम्हाला भारी हौस असेल आणि एखाद्या विषयावर त्यांच्याशी बोलत तुम्ही तासनतास घालवू शकता. तुमचा चेहरा चौकोनी असून तुमचे फीचर्स चांगले आहेत आणि डोळे काहीसे लहान आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एखादा तीळ किंवा खूण असू शकेल. तुमची बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुण यामुळे तुम्हाला अत्युच्च स्थानापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या स्वातंत्र्यात कुणी हस्तक्षेप केलेला तुम्हाला चालत नाही. तुमचा अजून एक गुण म्हणजे, तुम्ही तुमच्या मित्रांसाठी काहीही करू शकता. त्यामुळे तुमच्याशी संवाद साधताना कोणीही तुमचा शब्द खाली पडू देत नाही. ज्यांनी तुम्हाला एखाद्या प्रकारे मदत केली आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरता. अशा परिस्थितीत �
तुमच्याकडे नेतृत्व गुण आणि अत्युच्च स्थानावर पोहोचण्याचे कौशल्य आहे. जेव्हा कष्ट करायची गोष्ट येते तेव्हा तुम्ही स्मार्ट पद्धतीने काम करता. जोपर्यंत दुसऱ्यापासून तुम्हाला लाभ होत आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या जवळ असता. माणसांना ओळखण्याची हातोटी तुमच्याकडे आहे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यांचा वापर करता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला चिकटून बसता. त्याचप्रमाणे तुम्ही एक चांगले वक्ते व कलाकार आहात. एकदा तुम्ही बोलायला सुरुवात केली, की आपले म्हणणे पूर्ण मांडून झाल्यावरच तुम्ही शांत बसता.
शिक्षण आणि उत्पन्न तुम्ही चांगले लेखक आहात. तुम्ही एक यशस्वी अभिनेते होऊ शकता. तुम्ही कला आणि वाणिज्य क्षेत्रातही जाऊ शकता आणि उद्योग करून अर्थार्जन करू शकता. त्यामुळे तुम्ही नोकरी फार काळ करत नाही. तुम्ही नोकरी जरी केलीत तरी बाजूने तुम्ही उद्योगही सुरू ठेवाल. भौतिक गोष्टींचा विचार करता तुमची भरभराट होईल आणि पुरेशी संपत्ती गोळा कराल. कीटकनाशके किंवा विषारी द्रव्यांशी निगडित व्यवसाय, पेट्रोलिअम क्षेत्र, रसायनशास्त्र, सिगरेट आणि तंबाखूशी संबंधित व्यवसाय, योग प्रशिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, साहित्य, कला आणि पर्यटनाशी संबंधित काम, पत्रकारिता, लेखन, टंकलेखन, कापड उद्योग, नर्सिंग, स्टेशनरीचे उत्पादन आणि वितरण इत्यादी क्षेत्रे तुमच्यासाठी अनुकूल आहेत.
कौटुंबिक आयुष्य कोणी तुम्हाला पाठींबो देवो अगर न देवो, तुम्ही स्वत:चा निर्णय स्वत: घेता. तुम्ही कुटुंबात सर्वात थोरले असू शकाल आणि थोरले असल्यामुळे सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. तुमच्या जोडीदारामधील उणीवांकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे ठरेल. तसे ऩ झाल्यास तुमच्यात वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमची वागण्याची पद्धत आणि स्वभाव याने तुम्ही सगळ्यांवर प्रभाव पाडाल. जर तुम्ही या नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात जन्मला असाल तर तुम्ही खूपच नशीबवान ठराल.
राशी :- कन्या स्वामी :- बुध देवता :- पीताम्बर जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः उपास्यदेव :- श्री कुबेर रत्न :- पाचू जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.