Home 2021 May Punarvasu Nakshtrachi Bhavishvani

पुनर्वसू नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही नैतिक, आहे त्यात संतुष्ट राहणारे आणि समाधानी आहात. साधी राहणी उच्च विचारसरणी या म्हणीने तुमचे चपखल वर्णन करता येऊ शकते. तुमचा देवावर, परंपरांवर आणि रुढींवर खूप विश्वास आहे आणि तुमचे तुमच्या परंपरांवर प्रेम आहे. पैशाची बच करण्याचा तुमचा स्वभाव नाही. पण तुम्हाला आयुष्यात खूप आदर आणि सन्मान मिळेल. तुमच्या निरागसपणामुळे आणि पारदर्शकपणामुळे तुम्ही लोकप्रिय असाल. गरजूंच्या मागे तुम्ही नेहमी उभे राहता. बेकायदेशीर किंवा अनैतिक कृत्याच्या तुम्ही नेहमीच विरुद्ध असता. नकारात्मक विचार आणि माणसे यांच्यापासून तुम्ही नेहमी दूर राहता, कारण त्यामुळे तुमच्या आध्यात्मिक वाढीवर परिणाम होतो. तुमचा मेंदू आणि मन नेहमी संतुलित असते. दुसऱ्यांना समाधान आणि मदत करणे हा तुमचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. तुमची सौम्य, दयाळू आणि परोपरकारी वृत्ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देते. तुम�
त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या एकाग्रतेने आणि अगदी सहजपणे कोणतीही कठीण समस्या सोडवता. तुम्ही कितीही वेळा अयशस्वी झालात तरी प्रयत्न करणे सोडत नाही. तुम्ही बहुगुणी आहात आणि तम्ही कोणतीही गोष्ट अगदी अचूकपणे पूर्ण करता. त्यामुळे तुम्ही सर्वच क्षेत्रांत यशस्वी असता. तुम्ही तुमच्या पालकांचा आणि ज्येष्ठांचा खूप आदर करता. तुमच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही शांतताप्रिय, सद्सद् विवेकबुद्धीने वागणारे आणि प्रामाणिक आहात. तुमची मुलेसुद्धा सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागतात.
शिक्षण आणि उत्पन्न एक शिक्षक, लेखक, अभिनेता, डॉक्टर इत्यादी म्हणून तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळेल. लेखन, ज्योतिष शास्त्र, साहित्य, योग प्रशिक्षक, पर्यटन विभाग, हॉटेल किंवा रेस्टॉरंटशी संबंधित काम, मानसोपचारतज्ज्ञ, धार्मिक गुरू, पंडीत, पुजारी, परदेशी व्यापार, ऐतिहासिक वस्तूंची विक्री, प्राण्यांसाठी निवारा, रेडियो, दूरचित्रवाणी, दूरसंवादाशी संबंधित कामे, पोस्ट किंवा कुरिअर सेवा, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल.
कौटुंबिक आयुष्य तुम्ही तुमच्या पालकांची प्रत्येक आज्ञा मानता आणि शिक्षकांचा खूप आदर करता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या असू शकतील. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी समतोल साधून राहणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराला मानसिक किंवा इतर काही प्रकृतीच्या कुरबुरी असू शकतात. पण तुमच्या जोडीदाराकडे चांगले कौशल्य असून त्याचे व्यक्तिमत्त्व भुरळ पाडणारे आहे. तुमचा जोडीदारसुद्धा वरिष्ठांचा आदर करणारा असेल. तो/ती कुटुंब आणि मुलांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेईल
राशी :- कर्क स्वामी :- चंद्र देवता :- हरिवंश जप मंत्र :- ॐ ह्रीं हरिहराय नमः उपास्यदेव :- शिव रत्न :- मोती जन्माक्षर :- हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.