Home 2021 May Rohini Nakshtrachi Rushab Bhavishvani

रोहिणी नक्षत्राची व वृषभ भविष्यवाणी

तुमचा बांधा सडपातळ, लवचिक, आकर्षक असून तुमचे व्यक्तिमत्त्व लोभस असेल. तुमचे डोळे खूप सुंदर असतील आणि तुमचे हास्य दुसऱ्यावर मोहिनी घालणारे असेल. तुम्ही भावूक आणि निसर्गप्रेमी अाहात. तुम्ही अत्यंत विनम्र, सौम्य आणि सभ्य आहात. तुम्ही दुसऱ्याला समजून घेऊन त्याप्रमाणे त्याच्याशी वागता. तुमच्या समूहामध्ये तुम्ही लोकप्रिय आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असता. तुमचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाची छाप पाडून तुम्ही दुसऱ्याला सहज प्रभावित करता. त्यामुळे लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवतात.
असे असले तरी तुम्ही साधे, सरळ आणि स्वभावाने सच्चे आहात. तुमच्या कुटुंबाची, घराची, समाजाची, देशाची किंवा संपूर्ण जगाची सेवा करून तुमच्या क्षमता दाखवणे तुम्हाला आवडते. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्वत:ला व्यक्त करू शकता, त्यामुळे तुम्ही एक चांगले अभिनेते होऊ शकता. तुम्ही कलाप्रेमी आहात. तुम्हाला कलेची चांगली समज आहे आणि तुम्ही अत्यंत सृजनशील व्यक्ती आहात. इतरांचे कौशल्य वैधून घेण्याचे कौशल्य तुमच्याकडे आहे. कुटुंबव्यवस्था आणि समाजाने आखून दिलेल्या मूल्यांचा तुम्ही आदर करता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आणि समर्पित आहात. तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांसोबत नेहमी आनंद आणि समाधान मिळते
तुम्हाला पारंपरिक समजले जात असेल पण तुम्ही जुन्या विचारांना अनुसरत नाही कारण तुम्ही नव्या विचारांचा स्वीकार आणि बदलांचा स्वीकार करता. आरोग्याबाबत तुम्ही नेहमी सतर्क आणि जागृत असता. त्यामुळेच तुम्हाला विकार होत नाहीत आणि तुम्ही दीर्घायुषी होता. बहुधा तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता आणि लोकांवर सहज विश्वास ठेवता, ज्यामुळे कधी कधी तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. असे झाले तरीही तुम्ही नेहमी प्रामाणिकच राहता. तुम्ही वर्तमानता जगता आणि भविष्याची चिंता तुम्ही करत नाही. तुमचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. तुम्ही सगळी कामे मन लावून पूर्ण करता. जर तुम्ही सर्व काही संयमाने पूर्ण केलेत तर तुम्हाला एकमेवाद्वितीय असे यश मिळू शकेल. तुम्हाला तरुणपणी थोडे कष्ट करावे लागतील, पण वयाच्या ३८ व्या वर्षानंतर तुम्ही स्थिरस्थावर व्हाल.
राशी :- वृषभ  स्वामी :- शुक्र देवता :- वासुदेव विश्वरूप जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ वा व वी वि वु वू वे वं ब

 

वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे.
कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
शिक्षण आणि उत्पन्न तुम्ही अष्टपैलू आहात. याचा अर्थ तुम्हाला बहुतेक प्रत्येक विषयाच्या बाबतीत थोडी माहिती निश्चित असेल. तुमच्या करिअरमध्ये शैक्षणिक विभाग तुमच्यासाठी उत्तम असेल. असे असले तरी तुम्ही औषधशास्त्र, सुरक्षा, पोलीस, लष्कर, गुप्त सेवा, अभियांत्रिकी, शिक्षक, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्येही प्रयत्न करू शकता. तत्त्वज्ञान आणि संगीताकडे तुमचा ओढा असेल आणि यातूनही तुम्हाला अर्थार्जन करता येऊ शकेल. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला अनेक चढउतार पाहावे लागतील.
कौटुंबिक आयुष्य तुमचे तुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. असे असले तरी तुमचे तुमच्या वडिलांशी काही वाद होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या आईकडील नातेवाईक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि परिवाराच्या बाहेरील लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल. तुम्हाला कन्यारत्नांपेक्षा पुत्ररत्न अधिक असतील.
कोरोना व्हायरस: घरीच रहा आवश्यक असल्यासच घरातून बाहेर पडा. यामुळे तुम्ही नोवल कोरोना व्हायरस आणि कोविड -19 चा प्रसार थांबविण्यात मदत करू शकतात.
तुमचे जन्म नक्षत्र माहिती नसेल तर सचिस्तार माहिती साठी खालचा लिंक वरती जन्म तारिक पाठवा https://gurujisharad.com/kundali.php?service=Kundali_Dosh

.