Home 2021 May Krittika Nakshtrachi

कृत्तिका नक्षत्राची व तेचे राशी भविष्यवाणी

तुम्ही चांगले सल्लागार आणि सकारात्मक व्यक्ती आहात. रुबाबदार वागणूक हे तुमचे वैशिष्ट्य आहे आणि सुखवस्तू आयुष्य जगाल. तुमचा चेहरा अत्यंत चैतन्यपूर्ण आहे आणि तुमचा चालण्याचा वेगसुद्धा जलद आहे. इंग्रजीमधील क्रिटिकल हा शब्द कृतिका या शब्दावरून बेतलेला आहे. त्यामुळेच तुम्ही दुसऱ्यामधील उणीवा बारकाईने पाहता आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करता. त्याचप्रमाणे एखाद्या कामाच्या नष्कर्षाचे विश्लेषण करण्यात तुम्ही तज्ज्ञ आहात आणि त्यातील छुपे फायदे-तोटे तुम्ही शोधू शकता. तुम्ही नेहमी तुमचा शब्द पाळता आणि तुम्हाला समाजसेवेत रुची अाहे. तुम्ही प्रसिद्धीपराङ्मुख आहात आणि तुम्हाला कुणाकडूनही उपकार नको असतात. तुमचा स्वावलंबनावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत नाही आणि तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम असता. तुमचे बाह्यरूप कठोर वाटू शकते, पण तुमच्या आत मात्तु
म्हाला कुणालाही घाबरवायची इच्छा नसते. याशिवाय तुम्हाला आध्यात्मात रुची असेल. जप, तप, उपवास इत्यादी मार्ग अनुसरून तुम्ही आध्यात्मिक प्रगती साधाल. एकदा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालायचे ठरवले की, तुम्हाला तिथे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही मेहेनती व्यक्ती असून एखादी गोष्ट नियमितपणे करण्यावर तुमचा विश्वास आहे. शिक्षण असो, नोकरी किंवा व्यवसाय असो, तुम्हाला सर्वांच्या पुढे राहायचे आहे. अपयश आणि मागे राहणे तुम्ही सहनच करू शकत नाही. तुम्ही खूप प्रामाणिक असल्यामुळे फसविले जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून जास्तीत जास्त काळ लांब राहिलात तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. दुसऱ्याला समस्या सोडविण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या दयेने किंवा चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या प्रसिद्धी,
संपत्तीची हाव नाही. तुमच्याकडे अर्थाजन करण्यासाठी उत्तम कौशल्य आहे आणि कष्टाने कोणतेही ध्येय साध्य करण्याची तुम्हाला सवय आहे. तुम्ही आयुष्यात स्वत:च्या नियमांनुसार आणि तत्वांनुसार चालणारी व्यक्ती आहात. तुम्हाला संगीत आणि कलेत विशेष रुची असेल. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकता.
राशी :- वृषभ  स्वामी :- शुक्र देवता :- वासुदेव विश्वरूप जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ
वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
तुमचे जन्म नक्षत्र माहिती नसेल तर सचिस्तार माहिती साठी खालचा लिंक वरती जन्म तारिक पाठवा. कृपया कोणीही पेमेंट पाठवायची गरज नाही जन्म तारिक वेळ अपलोड करा. मला त्या मिळून जाते पेमेंट करू नका फ्री आहे