भरणी नक्षत्र व मेष राशी गुणधर्म
भरणी नक्षत्राची भविष्यवाणी व राशी फलादेश गुणधर्म:- तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या मनाचे आहात. त्याचप्रमाणे कुणी तुमच्याशी उद्धट वागलं तरी तुम्ही मनाला लावून घेत नाही. तुमचे डोळे मोठे आणि आकर्षक आहे. ते तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जातात. असं वाटतं की, तुमचे डोळे समोरच्या माणसाशी संवाद साधत आहेत. तुमचे मंत्रमुग्ध करणारे हास्य आणि किलर वृत्तीमुळे तुम्ही कुणावरही मोहिनी घालू शकता. तुमचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आहे. आतल्या आत तुम्ही फार गोंधळलेले असलात तरी चेहरा मात्र शांत असतो. तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे तुम्ही फार पुढचा विचार करत नाही. तुम्ही आयुष्याचा आनंद घेता आणि तुम्हाला धोका पत्करायला आवडतो. योग्य दिशा आणि आप्तेष्टांचा पाठींबा यामुळे तुम्ही तुमचे लक्ष्य लवकरच गाठता.
तुम्हाला शॉर्टकट घेणे आवडत नाही आणि सरळ मार्गाला तुमचे प्राधान्य असते. तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध काहीच करत नाही आणि दुसऱ्यांसमोर सर्व काही स्पष्ट करता. एखादे चांगले नाते गमावण्यासारखी परिस्थिती उद्भवली तरी तुम्ही तुमची बाजू स्पष्ट करता. तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान नेहमी जपता. म्हणूनच तुमची सर्व कामे स्वत:च करणे पसंत करता.
.भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे, जो पावित्र्य, सौंदर्य आणि कला दर्शवतो. यामुळेच तुम्ही हुशार, सौंदर्योपासक, भौतिक सुखांची आवड असलेले, संगीत प्रेमी, कलाप्रेमी आणि पर्यटक असता. तुम्हाला चांगले कपडे परिधान करणे आणि राजेशाही राहणीमान आवडते. त्याचप्रमाणे तुम्हाला विविध कला, गायन, खेळ आणि क्रीडा क्षेत्रात रुची आहे. हे नक्षत्र मुलींसाठीही सकारात्मक आहे कारण शुक्राच्या (सौंदर्याचा स्वामी आणि सौंदर्योपासक) परिणामामुळे त्यांच्या नाजूकपणात भर पडते. तुम्ही सकारात्मक आणि ज्येष्ठांबद्दल आदर राखता. तुम्ही संधी येण्याची वाट पाहत नाही, तर तुम्ही स्वत: संधी शोधता. तुमचे कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर प्रेम असेल. त्याचप्रमाणे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही वर्चस्व गाजवाल.
शिक्षण आणि उत्पन्न तुम्हाला संगीत, नृत्य, कला आणि अभिनय, मनोरंजन व नाट्यक्षेत्र, मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग, छायाचित्रण, व्हिडिओ एडिटिंग, सौंदर्याशी संबंधित व्यवसाय, प्रशासकीय कामे, शेती, जाहिरात, मोटार वाहनांशी निगडीत कामे, हॉटेल, कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळू शकेल. तुमचा बचत करण्याकडे कल दिसून येतो.
कौटुंबिक आयुष्य तुमचे तुमच्या कुटुंबीयांवर अत्यंत प्रेम आहे आणि तुम्ही एक दिवसही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा विवाह वयाच्या २३ ते २७ या वर्षांमध्ये होईल. तुमच्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप खर्च करता, कारण ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पुरेसे प्रेम, सहकार्य आणि विश्वास प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आदर करता. त्यामुळे तुम्ही आनंदी कौटुंबिक आयुष्य जगता
१२ राशी व त्यांचे स्वभाव आपल्या राशिवरून आपला स्वभाव पडताळून पहा आणि त्या प्रमाणे जाणून घ्या राशी :- मेष स्वामी :- मंगळ देवता :- भगवान विष्णु जप मंत्र :- ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- लू ले लो अ आ
मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ते ३० अंशात पसरली आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्या, धीट, महत्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणार्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
कालपुरूषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्याचा पक्षाघात,नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
तुमचे जन्म नक्षत्र माहिती नसेल तर सचिस्तार माहिती साठी खालचा लिंक वरती जन्म तारिक पाठवा. कृपया कोणीही पेमेंट पाठवायची गरज नाही जन्म तारिक वेळ अपलोड करा. मला त्या मिळून जाते पेमेंट करू नका फ्री आहे