Home 2021 May Ratsampti
menma

रथसप्‍तमी

रथसप्‍तमी हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृति यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृति सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी `रथसप्‍तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना रथसप्‍तमी आणि सूर्य यांच्याविषयी ईश्‍वराकडून मिळालेली माहिती पुढे देत आहोत.
१. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. २. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे
रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळलेली खीर प्रसादरूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले, तर त्याची सिद्धता हवी. याची आठवण करून देणारा हा सण !
३. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. संकलक : रथसप्‍तमीच्या दिवशी अंगणात गोवर्‍या पेटवून त्यावर बोळक्यात / सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर प्रसाद म्हणून सगळयांना वाटतात. दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवतात. या संदर्भातील शास्त्र काय आहे ?
महत्त्व:- सर्व संख्यांमध्ये `सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. `सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्‍तमी या तिथीला शक्‍ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्‍ति, आनंद आणि शांति यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्‍तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतिसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.
भारतीय संस्कृति आणि हिंदु धर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. १. सूर्योपासनेमुळे जिवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते.
२. सूर्याच्या उपासनेने सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता ३० टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता २० टक्क्यांनी वाढते. ३. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले, तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे, हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे. ४. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते. ५. पंचतत्त्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे (तेजतत्त्वाची उपासना करणे), हा महत्त्वाचा टप्पा आहे.
६. सूर्यनमस्कार घालणे : योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान २० वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. आ. कार्य हे कार्य स्थूल-नेत्रांनी जो सूर्य दिसतो, त्याचे नसून सूक्ष्मातील सूर्याच्या कार्याबाबतचे आहे. सूर्य जरी स्थिति संदर्भातील कार्य करत असला, तरीही साधनेला पूर्णत्व येण्यासाठी त्याच्याकडून उत्पत्ति आणि लय यांबाबतही कार्य झालेले आहे.
रथसप्तमीला करावयाचा सूर्यदेवाचा पूजाविधी रथसप्तमीला व्यक्तीने अरुणोदयकाली स्नान करावे. सूर्यादेवाची १२ नावे घेऊन न्यूनतम १२ सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्यहृदयस्तोत्रम्, सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम्, यांपैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे. रथसप्तमीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये. रथसप्तमीच्या दुसर्‍या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावेत. त्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते.’
ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवि (म्हणजे सूर्य) हा आत्माकारक आहे. ‘मानवी शरिरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्यशक्ती यांचा बोध रवीवरून होतो’, असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवि जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैद्यकशास्त्र इत्यादींचा कारक रवि आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार दर्शवतात. रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात.