Home 2021 May Mahashivratri
9a239964-ef4d-43bd-9fd0-3958a8b43c23

!! महाशिवरात्री !!

माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. पुष्कळ तप केल्याने वाढलेले तापमान न्यून करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच हिमाच्छादित कैलास पर्वतावर रहातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्पू
जाविधी महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळण्याची पद्धत अनेक कुटुंबांमध्ये पूर्वापार चालत आली आहे. त्यापैकी काही नियम असे… महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये. त्याचप्रमाणे आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. तुम्ही जर शिवरात्रीचा उपवास धरला असेल तर लवकर उठून गरम पाण्यानं आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून शंकराची पूजा करावी. शिवरात्रीला गहू, भात आणि डाळीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर फळे, दूध, चहा, कॉफी यांचे सेवन करावे. काळे कपडे घालू नका पांढरे वस्त्र घालावेत. शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये, असंही मानलं जातं.
महाशिवरात्रीच्या रात्री शंकराचे भजन, आरती करावी. उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून सोडावा. शिवलिंगावर तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध कधीच अर्पण करू नये. शिवलिंगावर नेहमी थंड दूध अर्पण करावं. शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा पंचामृत अर्पण करावे. दूध, दही, गंगाजल, केसर, मध आणि पाणी यापासून तयार झालेलं पंचामृत वापरावं. तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावं. त्यामध्ये एकही पानं तुटलेलं नसावे. बेलपत्राचे तोंड आपल्याकडे असावे. शिवलिंगावर फक्त पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावं. शिवलिंगावर केतकी आणि चंपा ही फूले अर्पण करू नयेत. शिवलिंगावर कुंकवाचा टिळा लावू नये. शिवरात्र रुद्राभिषेक करून साजरी केली जाते. (शिवलिंगावर जल, दुध, दही, मध, गुलाब पाणी आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्र पठण करावे).
तुम्हाला कल्पना आहे, जेंव्हा आपण वेदिक मंत्रांचे पठण करतो, तेव्हा हे मंत्र वातावरणात मोठे बदल घडवतात! वातावरण शुद्ध होते, सकारात्मकता वाढते, वाईट कर्मांचा नाश होतो आणि निसर्ग उत्सव साजरा करतो. म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी हजारो वर्षांपासून या दिवशी रुद्रपठण केले जाते. ‘वेळेवर पाऊस पडू दे, उत्तम पिके येऊ देत, आयुरारोग्य, धन धान्य, ज्ञान आणि मुक्ती प्राप्त होऊ दे,’ या प्रार्थनेसह रुद्राभिषेक केला जातो. शिव तत्वाशी संधान स्थापित व्हावे यासाठी रुद्राभिषेक केला जातो. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळ