वृषभ राशी भविष्य
April, 2022
वृषभ राशीतील जातकांसाठी हा महिना प्रत्येक क्षेत्रात चांगला राहणार आहे. करिअरच्या दृष्टीने खूप चांगला राहणार आहे. दशम भावात बृहस्पती, मंगळ आणि शुक्राची उपस्थिती राहील सोबतच, नवम भावात शनी ची उपस्थिती राहील या कारणाने, तुम्हाला भाग्याचे पूर्ण सहयोग मिळेल आणि कार्य क्षेत्रात यश मिळेल. नोकरीपेशा लोकांसाठी प्रमोशनाचे योग्य कायम राहतील. बृहस्पतीच्या एकादश भावात जाण्याने नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या जातकांना खूप फायदा मिळेल. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम परिणाम घेऊन येत आहे. या वेळी सूर्याची पंचम भावावर दृष्टी राहील सोबतच, ज्ञान कारक बृहस्पती महिन्याच्या सुरवाती मध्ये शुक्र आणि मंगळ सोबत होऊन चतुर्थ भावावर पूर्ण दृष्टीपात करतील. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वेळ राहील. कौटुंबिक जीवन समस्यांनी भरलेले असेल. महिन्याच्या उत्तरार्धात दुसऱ्या भावाचा स्वामी बुध, राहू सोबत द्वादश भावात राहील. या कारणाने कुटुंबात वाद-विवाद स्थिती बनू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर मतभद वाढू शकतात. या वेळी तुम्ही आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला सल्ला आहे की, कुणासोबत ही व्यर्थ वाद घालू नका आणि मोठ्या व्यक्तींसोबत आपला वेळ घालवा. प्रेम संबंधाच्या बाबतीत महिन्याचा उत्तरार्ध चांगला राहणार आहे. पंचम भावाचा स्वामी बुध, राहू च्या सोबत द्वादश भावात राहील. या व्यतिरिक्त महिन्याच्या पूर्वार्धात पंचम भावावर सूर्याची पूर्ण दृष्टी राहील. यामुळे तुमचे प्रेम जीवन सामान्य राहील. ही वेळ आर्थिक दृष्ट्या चांगली राहणार आहे कारण, या काळात बृहस्पती सोबत सूर्याच्या एकादश भावात स्थित होण्याने तुमच्यासाठी परीस्थिती अनुकूल राहील. या काळात धन लाभाचे योग आहेत. तुमच्या कमाई मध्ये सुधार पाहिला जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आव्हानात्मक असेल. या वेळी बुध आणि राहू द्वादश भावात स्थित होऊन सहाव्या भावाल बघेल. यामुळे आरोग्याला घेऊन तुमची समस्या वाढू शकते.
उपाय
भगवान गणेशाची उपासना करा.
कुमारी कन्यांना हिरव्या वस्तू दान करा.
रस्त्यावरील कुत्रांना भोजन द्या.
रविवारी भैरव मंदिरात जाऊन भैरव बाबाची पूजा करा.