garbadan

Home garbadan
f37c1139-def2-4be0-a1b2-7bb652da0d76

गर्भाधान संस्कार

गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होऊन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे. पतीने स्त्रीच्या पाठीमागे उभे राहून मंत्र म्हणून तिच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा किंवा दूर्वा यांचा रस पिळावा. तो रस पोटात गेल्यावर स्त्रीने आचमन करावे. उजवी नाकपुडी पिंगळानाडीची आहे. बहुतेक कार्ये यशस्वी होण्यासाठी पिंगळानाडी कार्यरत असणे पूरक ठरते. अश्वगंधा किंवा दूर्वा यांच्या रसाने ती नाडी कार्यरत होते.
या दिवशी स्त्रीला सुशोभीत आसनावर बसवितात,ओवाळुन औक्षण करतात.तिने चांगले दागीने,फुलमाला,(गजरा)इ.परीधान करावे.नंतर, पतीशी मिलन करावे. सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे- निषिक्तो य्त्प्रयोगेण गर्भ: सन्धार्यते स्त्रिया | तद् गर्भालम्बनं नाम कर्म प्रोक्तं मनीषिभि: || ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणतात.
१ अ. महत्त्व १. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जाते. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाते.

२. भगवंताच्या सृष्टीचक्राला गतीमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व आहे. सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’ १. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणार्‍या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार आहे. २. बीज अन् गर्भ या संदर्भातील दोष नाहीसे करणे आणि क्षेत्र (गर्भाशय) शुद्ध करणे. एकूण शारीरिक आणि मानसिक त्रासांपैकी २ टक्के त्रास बीजगर्भदोषांमुळे होतात. त्यांतील अर्धे त्रास शारीरिक आणि अर्धे मानसिक स्वरूपाचे असतात. बीजगर्भदोषाचा परिणाम किती टक्के व्यक्तींत कधी दिसून येतो

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता