पाचू रत्न
पाचू रत्न
फायदे
- पाचूचे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी काही फायदे हे नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील.
- चांगले आरोग्य आणि धनसंबंधी प्रगतीसाठी पाचू हा धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
- विषारी घटकांशी लढण्याची ताकद ही पाचूमध्ये असते. पाचू धारण केल्यामुळे सर्पदशांची शक्यता ही कमी होते.
- गर्भवती महिलांनी डिलीव्हरीच्या वेळी पाचू धारण केला तर त्यांना प्रसुतीच्या वेदना कमी होतात.
- ज्यांना बोलण्यास अडथळा असतो त्यांनी पाचू धारण केल्यास वाचा सुधारते असे म्हणतात.
- ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर आहे त्यांनी योग्य सल्ल्यानिशी पाचू धारण करावा.
- पाचू काही काळ पाण्यात ठेवून अशा पाण्याने डोळे धुवावे त्यामुळे नेत्ररोग होत नाहीत.
- पाचू हे रत्न शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे रत्न धारण केल्यामुळे पिक्त आणि पचनासंबधी असणारे त्रास कमी होण्यास मदत मिळते.
- स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पाचू मदत करते. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला पाचू घालण्यास सांगितले जाते.
- वीर्यशक्तीचा अभाव असल्यासही पाचू हा फारच फायदेशीर ठरतो.
- करणी किंवा कोणत्याही नकारात्मक उर्जेचा परिणाम हा पाचू धारण केलेल्या व्यक्तींवर होत नाही.
- आता जर तुम्हाला हे फायदे हवे असतील तर तुम्हीही योग्य सल्ल्यानंतर पाचू धारण करावा.