shri ganesh sthapna

Home shri ganesh sthapna
6e1bb194-3008-456a-90ff-2a17046e85c6

श्री गणेश स्थापना मुहूर्त २०२०

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आहे. या दिवशी भाद्रपद गणेशाची स्थापना करावी. गणेश स्थापना साहित्य यादी व ऑनलाईन पूजनासाठी जरुरी सूचना,
श्रीफळ २ हळद कुंकू गुलाल चंदन रांगोळी   कापूर कापूस अगरबत्ती धूप गोमूत्र खो. वाटी १ गुळ   जाणवी जोड २ सुपारी ५ खारीक ५ बदाम ५ अक्रोड ५ हळकुंड ५ तांदुळ   १ कि. शुद्धतूप (आरतीसाठी) आंब्याची डहाळी पंचा १ लालवस्र १ पेढे मोदक विड्याची पाने २५ फुलं, तुळशी, दुर्वा, बेल,पत्री हार १ वेणीगजरा १ पंचामृत अत्तर फळ ५(किमान – कमाल कितीही ) सुट्टे पैसे रु. पूजेसाठी लागणारी घरगुती भांडी ताम्हण २ कलश २ संध्यापळी  २ पंचीपात्र १ निरांजनी २ पंचारती १(असल्यास ) समई किंवा काचे सहित दिवे २ कापूरआरती १(असल्यास ) धुपपात्र १(असल्यास)पूजेचे साहित्य तयारीसाठी ताट ३ वाट्या किंवा द्रोण १० चमचे २ पूजेचे पाणी काढण्यासाठी पातेले १ चौरंग किंवा मखर सजवणे पाट ३
टीप १- सर्व प्रथम पूजेच्या सर्व वस्तु ताटामध्ये व्यवस्थित सोडून त्या वाटी किंवा द्रोण मध्ये भरून ठेवाव्यात. *२ – पंचामृत तयार करावे *३- समई आणि दिव्यामध्ये वाटी भरून घ्याव्यात. *४- देवाची मूर्ती स्थापन करण्याच्या जागी लाल वस्त्रं आच्छादन करावे व त्यावर तांदुळाचा स्वस्तिक काढावा . *५- मखराच्या बाजूने रांगोळी काढावी. *६- एका प्लेटमध्ये विड्याच्या पानाची पाच विडे तयार करून (सुपारी , हळकुंड, खारीक , अक्रोड ,बदाम,पैसा , फळ ) ठेवणे . *७- एक कलश घेऊन त्याच्यात पाणी , दुर्वा , आंब्याची पाने , सुपारी , अक्षता ,गंध , हळद , पैसा घालून वरती श्रीफळ (नारळ ) ठेवावा. कलशाच्या चार दिशांना चार आणि कलाशावरील श्रीफळास पाचव्या ठिकाणी गंध लावून  वेणी फुलांनी सजवावे.

*८- देवाची पार्थिव मूर्ती ठेवण्यासाठी बनवलेल्या मखरासमोर ताह्मण ठेवून त्याच्या डाव्या बाजूला कलश , पंचिपात्र (पेला) , पळी, पंचामृत व देवाच्या पू *९- देवाची मूर्ती पुसण्यासाठी व हात पुसण्यासाठी , जमीन पुसण्यासाठी वेगवेगळे वस्त्र जवळ ठेवावीत. *१०- नैवेद्य आरतीचे ताट तयार करावीत. (घरचा जेवणाचा किंवा मोदकाचा नैवेद्य तयार नसेल तर तो तयार झाल्यावर अर्पण करावा. पूजेसाठी मिठाई / गुळ  खोबऱ्याचा  नैवेद्य अर्पण करता येईल. ) *११- पार्थिव मूर्ती सोबत छोटी गणेशाची मूर्ती पूजनासाठी ठेवण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी सुरु आहे . ज्यांच्याकडे हि परंपरा असेल त्यांनी एका छोट्या ताह्मणात तांदूळ भरून हि मूर्ती तयार करून घ्यावी. शंख घंटी असल्यास  पूजेच्या साहित्यात काढू ठेवावेत . * १२ – शक्यतो देवाची मूर्ती मखरामध्ये काढलेल्या तांदुळाच्या स्वस्तिकवर ठेवल्यास पूजन करणे सोयीचे होईल. देवाची मूर्ती वरती ठेवल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करणे शक्य आहे.

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता