उपनयन
मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
उपनयन : गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:|बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:|| ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बालाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला “उपनयन” असे म्हणतात. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे. व्रतबंध : ‘व्रतबंध’ म्हणजे ‘व्रत / नियमांची बद्धता’. म्हणजेच पर्यायाने बालकाला या वेळेपासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी व यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो म्हणून ‘व्रतबंध’ हे नाव योग्य आहे. ही व्रते व नियम मानवी जीवनातील चार आश्रमांपैकी सर्वात पहिल्या म्हणजेच ‘ब्रह्मचर्य’ आश्रमातील ब्रह्मचर्यव्रताच्या संदर्भात असतात. ‘उपनयन’
मुंज : या संस्कारात, विधी करताना बटूच्या कंबरेत ‘मुंज’ नावाच्या दर्भाची दोरी (मेखला) बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते. कंबरेत बांधली जाणारी मेखला अत्यंत उपयुक्त आहे. मेखला कंबरेत बांधल्यामुळे हर्निया वगैरेसारखे रोग होत नाहीत.