वास्तुशास्त्र

Home वास्तुशास्त्र

वास्तू शांती

वास्तूशांती म्हणजे त्या वास्तू मधल्या अणू-रेणूवर झालेली एक प्रभावी परिणामकारक वैदिक प्रक्रिया होय. त्या अणू-रेणूंवर वास्तूशांती करताना पठण होणाऱ्या मंत्रांचा, शुभ विचारांचा परिणाम होतो. जगातला प्रत्येक कण दुसऱ्यावर परिणाम करत असतो. म्हणून तुमच्या परिसरातल्या एखाद्या वस्तूकडे पाहून तुम्ही चांगले किंवा वाईट विचार करता तेव्हा त्याचे पडसाद इतर कणांवरही पडतात. म्हणून जिथे तुम्ही वावरता तिथल्या वास्तूवर, मातीवर, वस्तूंवर विचारांच्या धक्क्यांचे परिणाम होतात.पूर्वी आपल्या घरी आपली वडीलधारी मंडळी सांगत असत की घरामध्ये क्लेश करू नये, अभद्र बोलू नये. वास्तूपुरुष ‘अस्तु’ म्हणत असतो. हे विचार आपल्यास पटण्यासाठी एकविसावं शतक उजाडलं आहे. यात अजून महत्त्वाचं रहस्य म्हणजे मूक विचारांचेही धक्के निर्माण होतातच. बिटा पातळीवरचे असे धक्के शास्त्रज्ञांनी मोजलेले आहेत. हे धक्के किंवा त्याचे परिणाम, तुम्ही जे बोलता किंवा करता त्या कामाचे परिणाम त्या वातावरणात राहतात. त्याचे परिणामही भिंतीवर, वस्तूवर, आसमंतात होतात. वास्तुशांतीमुळे वातावरणशुद्धी तर होतेच त्याचबरोबर त्या वातावरणात किंवा पूजेच्या वेळेस उपस्थित असणाऱ्या व्यक्तींची देहशुद्धी व मनशुद्धी होत असते. यासारखा प्रभावी उपाय दुसरा असूच शकत नाही. प्रत्येक धर्मात वास्तूशुद्धीचे प्रकार आहेत. पण सर्वात शास्त्रशुद्ध प्रकार म्हणजे वास्तूशांती आपल्या हिंदू धर्मात सांगितलेली आहे. दर पाच वर्षांनी घराची वास्तूशांती करावी. मात्र वास्तूप्रतिमा एकदाच निक्षेप करावी असं शास्त्रात सांगितलं आहे. दर पाच वर्षांनी वास्तूच्या शुद्धीचं वर्तुळ पूर्ण होतं. मत्सरापासून निर्माण झालेल्या लहरींचं उच्च्चाटन होतं. हा एक अनुभव आहे

घर बांधताना घ्यावयाची काळजी

जागा खरेदी करून आपल्या इच्छेनुसार घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असते. जागा घेताना प्लॉटवास्तुशास्‍त्राच्या नियमाचे पालन केले नाही तर घर बांधल्यानंतर आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असते. जागा खरेदी करण्यापूर्वी खालील नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.पुर्वी मातीची घरे असायची. दगड, माती व लाकूड यांचा वापर करून घरे बांधली जात होती. परंतु,आता आधुनिक काळात विटा, सिमेंट, चुना व आसारीचा वापर घर बांधणीत केला जातो. दगडी ठोकळे एकावर एक ठेवून घरे बांधली जात असत. दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडत असतो. कसा तो पहा.

पूर्व व आग्नेय दिशा उंच व पश्चिम व वायव्य दिशा खोल किंवा दक्षिण व आग्नेय उंच तसेच पश्चिम व उत्तर खोल असेल तर अशी जागा शुभ मानली जाते..
पश्चिम दिशा उंच व ईशान्य- पूर्व खोल असेल किंवा आग्नेय दिशा उंच व नैऋत्य-उत्तर दिशेला उतार असेल तर असा ही प्लॉट शुभ असतो.
उत्तर दिशा उंच व आग्नेय, नैऋत्य, वायव्य दिशा खोल असे किंवा नैऋत्य व आग्नेय उंच तसेच उत्तर दिशा खोल असेल तर अशी जागा खरेदी करणे लाभदायी असते.
आयताकार किंवा चौरस प्लॉट शुभ असतो.
गोमुखाकार व गोलाकार प्लॉट अत्यंत शुभ मानले जातात